Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मानवी चेहरा असलेले मांजराचे पिलू (Video)

cat
अनेक वेळा विचित्र चेहरा असलेल्या पशूंचा जन्म होत असतो व हे पशू अर्थात लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. आता मलेशियात असेच एक मांजर लोकांच्या कुतूहलाचा विषय बमनला आहे. या मांजराच्या पिलाचा चेहरा हुबेहुब माणसासारखा आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असले तरी हा प्रकार कितपत खरा आहे याबाबत शंका आहे.
 
पिलू सध्या मलेशियातील एका प्रयोगशाळेत ठेवले असल्याचे सांगितले जाते. मांजराचे डोळ, डोके, केस आणि त्वचा तसेच चेहर्‍याची ठेवणही मानवी चेहर्‍यासारखीच आहे. मात्र, पोलिसांनी हा एकूणच प्रकार खोया असून हे कदाचित सिलीकॉन बेबीचे खेळणे असावे असेही म्हटले आहे. सिलीकॉन बेबी वेअरवुल्फ नावाची कंपनी हुबेहुब मानवी बाळासारख्या खेळण्यांची निर्मिती करते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या गावात सगळ्यांचाच जन्म 1 जानेवारीला