Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आंतरराष्ट्रीय कामगार दिन : कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिन

आंतरराष्ट्रीय कामगार दिन :  कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिन
, शनिवार, 1 मे 2021 (09:30 IST)
१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. 
 
सध्याचा 'मे दिन' हा १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरु झाला. ज्याची मुख्य मागणी 'आठ तासाच्या कामाच्या दिवसाची' होती. या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरु केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले.
 
या घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने 'दुसऱ्या आंतरराष्ट्रीय'च्या १९८९ च्या पॅरीस परिषदेत केली. त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली.
 
हा दिवस प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशीच असतो. हा दिवस शिकागो मध्ये ४ मे १८८६ मध्ये घडलेल्या हेमार्केट घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी, साम्यवादी आणि अराजकतावादी पक्ष साजरा करतात. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो.
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगार दिन
अमेरिकी नागरिक 1 मे हा वसंत दिन म्हणून साजरा करतात.
जपानमध्ये एप्रिल 29 ते मे 5 हा आठवडा गोल्डन वीक या नावाने साजरा करतात. हा दिवस शोवा डे म्हणून साजरा केला जातो.
रशियामध्ये हा दिवस सैन्याचा परेड दिन म्हणून देखील ओखळला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शहरातील अमरधाम अपुरे पडत असताना नागापूर अमरधाममध्ये कोरोना मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था