suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

International Picnic Day 2026 : आंतरराष्ट्रीय सहल दिवस, रंजक इतिहास आणि महत्व

International Picnic Day
आंतरराष्ट्रीय सहल दिवस दरवर्षी १८ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. यात मित्र-परिवारासोबत बाहेर उद्यान, नदीकाठ, डोंगर किंवा घराच्या अंगणात सहल करणे, पिकनिक करणे, खाणे-पिणे आणि निसर्गाचा आनंद घेण्यावर भर दिला जातो.
 
दरवर्षी १८ जून हा दिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय सहल दिवस' म्हणजेच 'इंटरनॅशनल पिकनिक डे'  म्हणून साजरा केला जातो. धावपळीच्या आणि दगदगीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात, आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या खास दिवसानिमित्त जाणून घेऊया पिकनिक डेचे महत्त्व आणि हा दिवस साजरा करण्याच्या काही सुंदर कल्पना....
 
'पिकनिक' शब्दाचा रंजक इतिहास
'पिकनिक' हा शब्द मूळ फ्रेंच भाषेतील 'Pique-Nique' या शब्दावरून आला आहे. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंच क्रांतीनंतर जेव्हा राजेशाही बागा सामान्य जनतेसाठी खुल्या करण्यात आल्या, तेव्हा लोक एकत्र जमून घराबाहेर अन्न खाऊ लागले आणि इथूनच खऱ्या अर्थाने पिकनिक संस्कृतीची सुरुवात झाली.
 
उद्देश: औपचारिकतेपासून दूर राहून, निसर्गात आरामशीर वेळ घालवणे, एकत्र जेवणे आणि आनंद साजरा करणे.
 
आंतरराष्ट्रीय सहल दिवस कसा साजरा कराल?
निसर्गाच्या कुशीत जा: तुमच्या जवळील एखादी बाग, नदीकिनारा, समुद्रकिनारा किंवा टेकडीवर जाऊन चटई अंथरून बसा. निसर्गाच्या ताज्या हवेत वेळ घालवणे मनाला उभारी देते.
 
घरचे जेवण आणि गप्पा: घरातूनच डब्यात पोळी-भाजी, सँडविच, फळे किंवा पोहे असं हलकं-फुलकं जेवण बनवून सोबत न्या. बाहेर एकत्र बसून जेवणाची चव काही वेगळीच असते.
 
स्क्रीन-फ्री टाईम : सहलीला गेल्यावर मोबाईल, लॅपटॉप आणि सोशल मीडियापासून दूर राहा. समोरासमोर बसून गप्पा मारा, जुन्या आठवणींना उजाळा द्या.
 
मैदानी खेळ खेळा: लहानपणीचे खेळ जसे की अंताक्षरी, पत्त्ते, बॅडमिंटन, फ्रिसबी किंवा चेस खेळून बालपणीच्या आठवणी ताज्या करा.
 
सहलीला जाताना घ्यावयाची काळजी 
आपण ज्या ठिकाणी सहलीसाठी जातो, तिथला परिसर स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे सोबत एक कचऱ्याची पिशवी नक्की ठेवा, जेणेकरून प्लास्टिकचा कचरा किंवा खरकटं अन्न तिथेच पडून राहणार नाही. निसर्गाचा आनंद घेताना निसर्गाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्र सरकार २० जून रोजी पीएम किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता वितरित करण्याची शक्यता