Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्ञान प्रबोधिनी.....नेतृत्व विकसन स्थापित संस्था........

Webdunia
गुरूवार, 12 मार्च 2020 (17:57 IST)
ज्ञान प्रबोधिनी पुण्यात स्थापित असलेली एक समाजसेवी संस्था आहे. कै. विनायक विश्वनाथ आणि आप्पा पेंडसे यांनी मिळून सन 1962 साली या संस्थेची स्थापना केली. स्वदेशात विचार आणि कार्य प्रबोधन होऊन देशाचे 
कायापालट होऊन लोकमानसात नवं चैतन्य निर्माण व्हावे हाच या संस्थेचा मुख्य हेतू आहे. ही संस्था नेतृत्व विकसनासाठी स्थापित झाली आहे. ही संस्था शिक्षण,आरोग्य,ग्राम-विकास,संशोधन,युवा संघटन, स्त्री शक्ती प्रबोधन आदी 
क्षेत्रात कार्यशील आहे. पुणे,निगडी,सोलापूर,आंबेजोगाई, हराळी, या ठिकाणी ज्ञानप्रबोधिनीच्या शाळा आहे. गुरुकुल,क्रीडाकुल असे विभाग निगडीच्या शाळेत असून कार्यरत आहे.
*ज्ञान प्रबोधिनीची  प्रशाला-
 
ज्ञानप्रबोधिनीची प्रशाला किंवा शाळा 1968 सन पासून सुरु झालेली आहे. याचे अभ्यासक्रम CBSE च्या अभ्यासक्रमानुसार असते. शिक्षण इंग्रजी,हिंदी,मराठी,संस्कृत या माध्यमातून दिले जाते तर गणित,समाजशास्त्र आणि शास्त्र हे 
इंग्रजी भाषेतून शिकवले जाते. इथे  इयत्ता 5 वी ते 10वी पर्यंत आहे. प्रत्येक इयत्तेत 20 मुली आणि 20 मुलं अशे प्रत्येक तुकडीत 40 मुलें असतात. दर शुक्रवारी शाळेत एका विषयाची परीक्षा असते. शाळेत मुलांना वेग-वेगळे 
प्रकल्प देखील असतात जसं भविष्यवेध प्रकल्प, विशेष उद्दिष्टय गट .
 
*संत्रिका -
संस्कृत आणि संस्कृतीचा शोध घेणारी(संशोधिका) "संत्रिका " ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा महत्वाचा विभाग आहे. कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांचा मार्गदर्शनाखाली 22 जुलै 1975 रोजी या विभागाची स्थापना झाली.या विभागात एक 
ग्रंथालय आहे ज्याचा मध्ये तब्बल 13000 ग्रंथ आहे.
 ज्या मध्ये संस्कृत पुस्तके,हस्तलिखिते कोश,संदर्भ कोश, रामायण संग्रह,व अन्य ग्रंथ आहे. रामायण संग्रहात 1957 पुस्तके 33 भाषेत आणि 18 विविध लिपीं मध्ये आहे. 23 भारतीय भाषा आणि 10 परदेशी भाषेत आहे. या 
विभागात ज्ञान प्रबोधिनी पद्धत्तीने संस्कार करणारे 40 पेक्षा जास्त पुरोहित कार्यरत आहे. हे पुरोहित संपूर्ण भारतभरात प्रबोधिनी पद्धतीने विविध संस्कार आणि शांती करतात.पौरोहित्याचे यामध्ये मोठे योगदान 
आहे.सार्थता,सामूहिकता,शिस्त आणि समभाव या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. सर्व जाती पंथाच्या लोकांसाठी पौरोहित्याचे वर्ग संत्रिकेत सन 1992 पासून घेतले जात आहे. स्वयं पौरोहित्य शिकवणे या मागचा हेतू आहे.
 
*उद्योजकता विभाग -
या विभागात साहस सहली,विज्ञानदले,तंबू शिबिरे,अभ्यास शिबिरे,विक्री उपक्रम, गणेशोत्सव पालखी विस्तार शिबिरे क्रीडा प्रात्यक्षिके,अभ्यास दौरे घेतले जाते .जेणेकरून या माध्यमांतून 
 महाविद्यालयातील युवक- युवती संघटन व नेतृत्व विकसन होते.
   
* स्त्री शक्ती प्रबोधन (ग्रामीण) -
भोर,वेल्हे,आणि हवेली या पुण्याजवळतील तीन तालुक्यांत ग्रामीण महिलेंसाठी काम केले जाते. पुणे जिल्ह्यातील शिवगंगा- गुंजवणी खोऱ्यात ग्रामीण शक्तीचे संघटन दारूबंदी आंदोलनाद्वारे सुरु झाले.या मध्ये महिलांसाठीचे बचतगट सुरु झाले. हे बचत गट 1995 साली सुरु झाले असून तब्ब्ल 300 गटाचे काम 45 गावात चालत असतात  जवळपास या गटांमध्ये  5200  महिला सभासद आहे. गटाची वार्षिक उलाढाल 2 .५ रुपयांची आहे. या गटांच्या माध्यमातून महिलांना उद्योजकता विकास,आरोग्य व ग्रामीण नेतृत्वाचे,किशोरी विकास,युवती विकास,हिरकणी महिला प्रशिक्षण दिले जाते. दुर्गम भागात  मुलींसाठीचे वसती गृह चालवले जाते.पुण्यातील भोर तालुक्यातील खोपी गावात देशव्यापी चाललेल्या बँक इन्क्लुजन कार्यक्रमांतर्गत 100 % बँक खाती काढून हे गाव महाराष्ट्रात प्रथम आले आहे. या बचतगटाचा उद्देश्य ग्रामीण महिला साक्षर होऊन स्वावलंबी व्हायला हवे. असा आहे.  
शब्द ते शक्ती प्रकल्प -
या प्रकल्पांतर्गत किशोरी युवती,महिलांसाठी व्यक्तिमत्व विकसन,आरोग्य स्वयंरोजगार,नेतृत्व प्रशिक्षण दिले जाते.
ग्रामीण माता व बालकेंसाठी आरोग्य प्रकल्प आणि आरोग्य प्रबोधिका प्रशिक्षण दिले जाते.त्याच बरोबर अंगणवाडीताईची गुणवत्ता वाढीसाठीचे प्रशिक्षण दिले जाते.
ग्रामविकसन विभाग हा पण ज्ञानप्रबोधिनीचा महत्वाचा भाग आहे.
 
* स्त्री शक्ती प्रबोधन (शहरी) : संवादिनी -
हा गट पदवीधारी गृहिणी चालवतात. सन 2000 साली पुण्यात या गटाची स्थापना झाली. याचा हेतू "व्यक्तिविकासातून सामाजिक विकास करणे" अर्थात स्वतःचा व्यक्तिविकास करतांना समाजासाठी काहीतरी करणारा हा गट महिलांचाच आहे. मासिक बैठक घेऊन कामाचा आणि सभासदांच्या विषयांच्या प्रशिक्षणाचा आढावा घेतला जातो.आवडीच्या गटात काम करायला मिळेल या प्रेरणेने  महिला गटात येतात.
 
* स्पर्धा परीक्षा केंद्र - 
शासकीय नौकरीसाठी ज्या कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात त्यांची तयारी या विभागात केली जाते.उत्तम अधिकारी निर्माण होण्यासाठीचे प्रशिक्षण इथे दिलेले जाते.
 
* छात्र प्रबोधन -
किशोरवयीन मुलांना वाचण्याची आवड लागावी त्यासाठी संस्थेने 1992 साला पासून छात्र प्रबोधन मासिक काढले आहे. त्यांना साहित्याचा सकस आहार मिळावा. या साथीचे मासिके उपलब्ध असतात. वाचकांचा कृतीशील सहभागासाठी संपादक मंडळ जागरूक आहे. अंकाची सुलभ आवृत्ती,इंग्रजी आवृत्ती,युवांसाठी "युवोन्मेष" अंक काढतात.
 
* नागर वस्ती विभाग -
 जवळ पास पुण्याच्या 30 वस्त्यांचा अभ्यास करून ज्ञान प्रबोधिनीने नागर वस्ती विकासासाठी कार्य सुरू केले आहे . त्यात किशोर विकास, महिला विकास, किशोरी विकासाठी स्वतंत्र उपक्रम घेतले जातात.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

मुंबईतील सोन्या-चांदीचे आजचे दर जाणून घ्या

धोनी चेन्नईत शेवटचा सामना खेळणार!CSK सीईओ विश्वनाथयांचा खुलासा

हिंदूंना नाही तर भाजपला धोका आहे, असे का म्हणाले विजय वडेट्टीवार?

उद्धव ठाकरेंच्या 2 दिवसांत दोनदा तपासण्यांमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं, निवडणूक आयोग म्हणाला- शहा आणि नड्डा यांचीही चौकशी झाली

24 तासांत दुसऱ्यांदा तपास, शिवसेना यूबीटी नेते उद्धव ठाकरे संतापले

पुढील लेख
Show comments