Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

गुजरातच्या या गावात कुत्रे कोट्यधीश...

गुजरातच्या या गावात कुत्रे कोट्यधीश...
ऐकण्यात विचित्र असले तरी हे खरं आहे. ही माहिती हैराण करणारी आहे कारण हे मिलियनेअर कुत्रे आवारा असले तरी एखाद्या शेठजींच्या तुलनेत कमी नाही. कोट्यधीश कुत्र्यांच्या या गावाचे नाव पंचोत आहे आणि हे गाव गुजरातच्या महेसाणा जिल्ह्यात स्थित आहे.
 
खरं तर, गावात एक ट्रस्ट संचलित होतं ज्याचे नाव 'मध नी पति कुतारिया ट्रस्ट' असे आहे. या ट्रस्टकडे 21 बिघा जमीन आहे. ही जमीन कुत्र्यांच्या नावावर नाही परंतू या भूमीहून होणारी आय कुत्र्यांसाठी वापरली जाते. राधनपुर-महेसाणा बायपास स्थित या जमिनीची किंमत सतत वाढत आहे आणि वर्तमानात याची किंमत साडे तीन कोटी रुपये प्रति बिघा आहे.
 
ट्रस्टचे अध्यक्ष छगनभाई पटेल यांच्याप्रमाणे जनावरांसाठी दया पंचोत गाव जुन्या परंपरेचा भाग आहे. 'मध नी पति कुतारिया ट्रस्टची सुरुआत जमिनीचा तुकडा दान करण्याची परंपरेमुळे झाली. काही प्रकरणांमध्ये लोकांनी असहाळ होऊन जमीन दान केली. खरं तर तेव्हा भूमी मालक टॅक्स भुगतान करण्यात अक्षम होते म्हणून ते जमीन दान करून दायित्व पासून मोकळे झाले. 
 
त्यांनी सांगितले की सुमारे 70 वर्षापूर्वी पूर्ण जमीन ट्रस्टच्या अंतर्गत आली परंतू भूमीच्या रेकॉर्डमध्ये जमीन अजूनही मूळ मालकाच्या नावावर आहे ही मात्र काळजीची बाब आहे. तसेच जमिनीची किंमत चांगलीच वाढली आहे म्हणून मालक पुन्हा जमीन मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. तरी पण ही जमीन जनावर आणि समाज सेवेसाठी दान केली गेली आहे.
 
...आणि तयार झाला रोटला घर 
धर्मार्थ परंपरेच्या नावावर सुरू झालेला हा ट्रस्ट केवळ कुत्र्यांच्या सेवेसाठी मर्यादित नाही. ट्रस्टचे स्वयंसेवक सर्व पक्षी व जनावरांची सेवा करतात. ट्रस्टला पक्ष्यांसाठी 500 किलो धान्य प्राप्त होतं. ट्रस्टने 2015 मध्ये एका इमारतीचे निर्माण केले होते ज्याला रोटला घर असे नाव देण्यात आले.
 
येथे दोन महिला दररोज 20-30 किलो पिठाने सुमारे 80 किलो पोळ्या बनवतात. स्वयंसेवक रोटला आणि फ्लॅटब्रेड ठेल्यावर ठेवून सकाळी साडे सात वाजेपासून याचे वितरण सुरू करतात. यात सुमारे एक तास लागतो. एवढेच नव्हे तर ट्रस्ट द्वारे स्थानिक कुत्र्यांव्यतिरिक्त बाह्य कुत्र्यांनाही जेवण उपलब्ध केलं जातं. महिन्यातून दोनदा यांना लाडूदेखील खायला देण्यात येतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदी लंडनमध्ये साजरी करणार आंबेडकर जयंती