suvichar

या शाळेत शिक्षकच घेतात विद्यार्थ्यांचा आशीर्वाद

Webdunia
हिंदू धर्मात ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांना सन्मान देण्याची पद्धत आहे. याबदल्यात ज्येष्ठांकडून आशीर्वादही मिळतात. याशिवाय शिक्षकांनाही गुरू मानत असल्याने त्यांच्याही पाया पडले जाते. मात्र, मुंबईतील एका शाळेत याच्या उलट घडताना दिसते. याठिकाणी शिक्षकच विद्यार्थ्यांना नमस्कार करत असल्याचे दिसते. ऋषिकुल गुरूकुल विद्यालयाचे हे चित्र रोज सकाळी पहायला मिळते. आता ही पद्धत कशामुळे पडली असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. तर भारतात लहान मुलांना देवासमान मानले जात असल्याने त्यांना नमस्कार करणे म्हणजे देवाला नमस्कार केल्यासारखेच आहे. या पद्धतीमुळे मुलांच्या मनातही शिक्षकांबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे.
 
या शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांकडून आशीर्वाद मागतात. नकळत याचा परिणाम या लहानग्यांच्या मनावर होते आणि आपणही आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍यांबरोबरच लहानांचाही सन्मान केला पाहिजे ही भावना रूजते. मुंबईतील घाटकोपरमध्ये असणारी ही शाळा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांनीच शिक्षकांना आदर देऊन त्यांना नमस्कार केला पाहिजे या पारंपरिक संकल्पनेला छेद देत या शाळेने एक वेगळा उपक्रम राबविला असल्याचे या निर्णयावरून दिसून येत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

धर्मापेक्षा सुरक्षा महत्त्वाची! विमानतळाजवळ नमाज अदा करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

LIVE: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील

नवे राज्यपाल: महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्यातील व्यक्तीकडे राज्याची धुरा

भारत T20 वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचले

Maharashtra Budget 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील

पुढील लेख
Show comments