Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

National Kitten Day 2026 : १० जुलै राष्ट्रीय मांजर पिल्लू दिवस

National Kitten Day 2026
दरवर्षी १० जुलै रोजी राष्ट्रीय मांजर पिल्लू दिवस साजरा केला जातो. हा दिवस मांजरीच्या लहान आणि गोंडस पिल्लांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची व संगोपनाची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.  

अनेकांना मांजर हा प्राणी आवडतो तसेच बहुतेक घरांमध्ये मांजर आपल्याला पाहावयास मिळते. मांजरीप्रमाणेच तिचे पिल्लू देखील खूप गोंडस असते.म्हणूनच मांजरीच्या लहान आणि गोंडस पिल्लांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची व संगोपनाची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १० जुलै रोजी राष्ट्रीय मांजर पिल्लू दिवस साजरा केला जातो.

या दिवसाचा मुख्य उद्देश
दत्तक घेण्यास प्रोत्साहन देणे: अनेक पाळीव प्राण्यांच्या आश्रयस्थानांमध्ये मांजरीची पिल्ले घराच्या शोधात असतात. त्यांना विकत घेण्याऐवजी दत्तक घेण्यास प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मोठा उद्देश आहे.  

योग्य संगोपनाची माहिती: लहान पिल्लांना सुरुवातीच्या काळात विशेष आहाराची, लसीकरणाची आणि काळजीची गरज असते, त्याबद्दल लोकांना जागरूक करणे.  

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीनमध्ये एका मोठ्या बूट कारखान्यात लागलेला भीषण आगीत 28 जण ठार