केवळ 90 लोकसंख्या असलेल्या तासलोट या छोट्याशा कोलाम पोडावरच्या गावकऱ्यांनी कळंब तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे नाव मोठं केलं आहे . श्रमदायातून या गावचा नव्हे तर लगतच्या दोन गावचाही कायापालट केला आहे तासलोट येथील ग्रामस्थांच्या परिश्रमाने देवनाळा आणि वाढोना खुर्द या दोन गावात पाण्याची समृद्धी आली आहे.
कालपर्यंत या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागायची पावसाच्या पाण्यावरच एकच पीक घ्यावे लागायचे या सर्वामध्ये वर्षभराचा प्रपंच चालविण्यासाठी कुणाला उसनवारी किंवा कर्ज काढावे लागायचे आणि वर्षभर गावात रोजगार मिळेल याची शाशवती नव्हती आता मात्र या तासलोट गावचा चेहरा मोहरा गावकऱ्यांच्या एकजुटीने बदलला आहे
एकदिलाने केलेल्या श्रमदानातून हे चित्र पालटले आहे सोबतीला अधिकारी कर्मचारी आणि सामाजिक संस्थांनी तासलोटच्या गावकर्यांना दिलेली साथ त्यामुळे आज गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेय.
कळंब येथून जोडामोह कडे जातांना उजवीकडे उंच टेकड्याची रांग लागते त्यात एका टेकडीवर केवळ 90 लोकसंख्या असलेलं तासलोट हे आदिवासी कोलाम पोड आहे येथे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना कायमची वणवण करावी लागायची गावापासून लांब असलेल्या विहिरीची पाणी पातळी हिवाळ्यातच तळ गाठलेली त्यात उन्हाळ्यात तर पाण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागायचे .
मात्र सन 2019 मध्ये पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा मध्ये 8 एप्रिल ते 27 मे दरम्यान येथे भरपूर कामे झाली या अगोदर या स्पर्धेच्या माध्यमातून तासलोट गावाची निवड झाली पुढे त्यानिमित्ताने गावात अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्याच वेळी यवतमाळ चे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व्हराडे यांनी सलग पुढील 50 दिवस गावात गावकऱ्यांच्या सोबतीने सामान्य गावकरी म्हणून पहिल्या दिवसापासून येथे श्रमदान केले त्यांचे योगदान पाहून अनेक व्यक्ती सामाजिक संस्था गावकऱ्यांच्या सोबतीला येऊन गावासाठी श्रमदान केले आणि मग काय गावकऱ्यांचा उत्साह वाढला अधिकारी स्वतः गावात श्रमदान करीत असल्याने यंत्रणा सुद्धा या महत्त्वाच्या कार्यास हातभार लावायला जुळली आणि पुढे अनेक सामाजिक संस्था येथे आल्या आणि मोठ्या संख्येने गावात कधी नव्हे ते लोकांचे जठ्ठे च्या जतथे श्रमदान साठी एकवटली यात संकल्प फाउंडेशन आणि प्रयास संस्थाही पुढे आल्या आणि कधी नव्हे ते काम गावात झाले
रोज सूर्योदयापासून येथे श्रमदानाला सुरवात व्हायची सूर्य डोक्यावर आल्यावर थोडी विश्रांती घेतली की पुन्हा गावकरी सायंकाळी गाव तेवढ्याच उत्साहाने रात्री उशिरा पर्यंत गाव श्रमदान करीत असायचे
गावातील सर्वच व्यक्ती सकाळीसच कामावर हजर व्हायची मिळेल ते काम संपूर्ण जबाबदारीने काम व्हायचे विशेष म्हणजे याच तासलोत गावातील दिवंगत लक्ष्मी टेकाम ह्या जन्मताच दोन्ही हात नसलेली दिव्यांग महिला मात्र गाव पाणीदार करण्यासाठी लक्ष्मी स्वतः हुन पुढे आली आणि गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लक्ष्मीने तेवढ्याच एकग्रतेने पुढच्या पिढी साठी तिने पाणी साठवणूक करण्यासाठी प्ररिश्रम घेतले लक्ष्मी टेकाम समोर अडचणी होत्या मात्र जिद्दीने तिने त्या सर्व अडचणीला पराभूत केले दगडी बांध तयार करण्यापासून माती काम करताना फावडे , घमेले ,टोपल घेवुन काम केले शिवाय श्रमदान करून थकलेल्या लोकांची पाणी पाजून त्यांची तहान सुद्धा भागविली मागील वर्षी त्यांचा आजारपणात मृत्यू झाला मात्र आज त्यांनी केलेल्या कामाची सर्वच गावकरी आठवण करतात .
दुष्काळ दूर करण्यासाठी श्रमदान करणारे हजारो हाथ येथे राबली ती केवळ पाणी टंचाई सारखी समस्या कायमची हद्दपार करण्यासाठी गावात विहीर पुनर्भरण, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण ,अनगड दगडी बांध, ग्याबियन बंधारे, ग्रेडेड कंटूर बांध आणि 11 शेततळी झाली त्यात काही गावकरी आज मत्स्यपालन करतात खऱ्या अर्थाने आज गाव पाणीदार झाले आहे
पूर्वी गावात लोकांच्या हाताला काम मिळायची नाही त्यांना आता वर्षभर गावातच रोजगार मिळत आहे गावाचे शेतकरी पूर्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबून होते तेथे आज भाजीपाला पिकासह दोन-तीन पीक शेतकरी घेत आहेत आणि कर्ज घेणाऱ्यांची संख्या सुध्दा गावात कमी झाली त्यामुळे गाव आता समृद्धीकडे वाटचाल करायला लागलाय
पूर्वी पावसाळ्याच्या दिवसातही गावांमध्ये 4 कोटी आठ लक्ष लिटर एवढेच पाणी साठविले जायचे मात्र गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांनी सामाजिक संस्थांच्या संस्थांनी कार्यकर्त्यांनी श्रमदान केलं त्यानंतर मात्र आज या गावांमध्ये पाण्याची मुबलकता आहे पाण्याने बंधारे तुडुंब भरले आहे ज्या विहिरीवर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना लांब जावं लागायचं तिथं आज गावातच भरपूर पाणी मिळत आहे जिथून पाणी पुरवठा गावात होतो ती विहीर ही तुडुंब भरलेली आहे शेततळे भरले आहे बंधारे भरलेले आहे आणि विशेष म्हणजे आज या गावांमध्ये जून २०२२ मध्ये आता साधारण 27 करोड 29 लाख चार हजार लिटर एवढे पाणी साठवणूक शिल्लक आहे पावसाळ्यात यात आणखी वाढ होते असे माजी सरपंच नंदू डहारे यांनी सांगितले आहे .
गावात पाणी पुनर्भरण ची काम झाली त्यामुळे गावात पावसाचे नाही तर सांडपाणी सुद्धा आता वाहून जात नाही गावातील घरोघरी शोषखड्डे तयार करण्यात आली आहेत त्यामुळे पाण्याचा थेंब न थेंब येथे जमिनीत जिरविला मुरविला जातोय पूर्वी श्रमदान करणाऱ्या गावकर्यांना ईतर लोक हसायचे काय काम करताय असे म्हणायचे तेच लोक आज तुम्ही खूप मेहनत घेतली त्यामुळे आज गाव पाणीदार झाल्याचे आवर्जून लोक बोलतात असे लेतु टेकाम यांनी संगीतले .
या गावाने श्रमदानाने ख ऱ्या अर्थाने या गावची कायापालट केली आहे महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली आहे गुरांना चारा मिळालेला आहे त्यामुळे गावांमध्ये आता उत्पन्नात वाढ झाली आहे आणि आम्ही वेगवेगळे पीक घेत असल्यामुळे चार पैसे हातात येत आहेत चवळी भेंडी सारखी भाजीपाला पीक आम्ही घ्यायला लागलो आहे शिवाय इतरही कापूस सोयाबीन सह तूर ज्वारी पीक गावकरी घेतात असे परमेश्वर मेश्राम , विठ्ठल रामगडे ज्ञानेश्वर मेश्राम दिलीप जुनघरे आणि लहानू टेकाम या सर्व गावकऱ्यांनी सांगितले आहे .
हे सर्व गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानातून आणि निवासी जिल्हाधिकारी ललित कुमार वराडे यांनी घेतलेल्या पुढाकाराने गावाचा कायापालट झाला आहे गावाला 2019 च्या वोटर कप स्पर्धेमध्ये पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे आणि आज हे गाव अनेकांसाठी आदर्श ठरत आहे .
ग्रामीण भागात झोकून देऊन राबणारी माणसे अनेकांनसाठी या निमित्ताने ऊर्जास्त्रोत झाली आहे जलसंधारणातून मनसंधारण करून दुष्काळावर मात करता येते या गोष्टीचा प्रत्यय या तासलोट गावाकडे पाहून होतो तेव्हा आपण सर्वानी एकदा या गावाला नक्की भेट द्यावी.
विशेष लेख सहाय्य - कपिल श्याकुवर मुक्त पत्रकार , यवतमाळ