Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"प्रार्थनेत असणं हेच पुरेसं असतं"

Webdunia
बुधवार, 24 मार्च 2021 (15:08 IST)
एकदा एका शिष्याने समर्थ रामदासांना विचारले, "गुरुजी, प्रार्थनेचे अनंत प्रकार आहेत. कोणी वाद्य वाजवून कोणी गाऊन, ओरडून, कोणी करूणा भाकून, कोणी डोळे मिटून तर कोणी मौन प्रार्थना करतात. पण प्रार्थना मौन असली तरी ओठ हलतात, चर्येवर भाव उमटतात, आपण मात्र अगदी निश्चल राहून प्रार्थना करता, असे का ?"
 
रामदास स्वामी हसले, म्हणाले, "एकदा मी असा प्रसंग पाहिला की, एका राजवाड्याच्या दारात एक भिकारी उभा होता. अत्यंत कृश, पोट खपाटीला गेलेलं, अंगावर चिंध्या, आत्ता पडेल की मग पडेल अशी स्थिती. डोळे आशाळभूतासारखे सर्वांवरून फिरत होते. थोडा वेळ वाट पाहून राजाने त्याला बोलावले. विचारले, "बोल, काय पाहिजे तुला?"
 
"माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे असेल हे जर समजत नसेल, तर मला काहीच मागायचे नाही. मी तुमच्या द्वारी उभा आहे ! माझ्याकडे नीट पहा, माझं असं असणं, माझी अवस्था, हीच माझी प्रार्थना आहे. या वेगळं शब्दात काय सांगू?"
 
समर्थ म्हणाले, "त्या दिवसापासून मी प्रार्थना बंद केली. मी परमेश्वराच्या दारी उभा आहे. तो अंतर्यामी आहे, माझ्या मनात काय आहे ते तो जाणतो. या परते शब्दात काय मागू ?  
 
'तो' बघून घेईल. जर माझी 'स्थिती' काही सांगू शकत नसेल तर शब्द काय सांगणार? जर माझी 'अवस्था' त्याला समजत नसेल, तर शब्द काय समजणार? 
 
म्हणून अंतःकरणातले भाव आणि दृढ विश्वास हेच खर्‍या परमेश्वर प्रार्थनेचे लक्षण आहे. तिथे 'मागणं' काही उरत नाही. तुम्ही प्रार्थनेत 'असणं' हेच पुरेसं असतं"
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आता मरीन ड्राइव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्या हस्ते बो-स्ट्रिंग आर्क ब्रिजचे उद्घाटन

राज्यमंत्री आत्राम यांच्या मुलीचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, वडिलांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता

पीएम मोदी आणि चंद्रचूडच्या भेटीमुळे नाराज संजय राऊत, म्हणाले- CJI ने या प्रकरणांपासून दूर राहावे

सीपीआयएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन; वयाच्या 72 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला

7.5 कोटींची मालमत्ता असलेला भिकारी कोण? मुंबई- पुण्यात करोडोची प्रॉपर्टी

पुढील लेख
Show comments