suvichar

या एकमेव शिवमंदिरात फडकविला जातो तिरंगा

Webdunia
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (14:49 IST)
भारत हा मंदिरांचा देश आहे. येथे हजारो मंदिरे आहेत तसेच त्यांची वास्तुरचना, इतिहास, पूजा नियम, स्थाने ही वेगवेगळी आहेत. मात्र देवाच्या भक्तीबरोबरच देशाच्या स्वातंत्र्याचा मानही जेथे राखला जातो असे एकमेव मंदिर आहे ते रांचीमधील पहाडी शिवमंदिर.
 
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनाला मंदिराच्या ध्वजाबरोबरच तिरंगा फडकविला जातो. या मंदिराची कहाणी मोठी रोचक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात यावर ब्रिटिशांचा ताबा होता व येथे ब्रिटिश, स्वातंत्र्यसैनिकांना फाशी देत असत. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या स्वातंत्र्यदिनाला येथे भारताचा तिरंगा फडकावला गेला. रांचीत फडकलेला हा पहिला तिरंगा होता.
 
स्वातंत्र्यसैनिक कृष्णचंद्र दास यांनी तो फडकावला होता व शहिदांची आठवण व त्यांना सन्मान देण्यासाठी नंतर प्रतिवर्षी येथे ध्वजारोहण केले जाऊ लागले. येथे एक शिला आहे त्यावर 14 व 15 ऑगस्ट 1947 चा मध्यरात्रीचा स्वातंत्र्याचा संदेश कोरला आहे. रेल्वे स्टेशनपासून 7 किमी वर असलेल्या या मंदिराचे जुने नांव होते टिरीबुरू. ब्रिटिश आल्यानंतर त्यांचे नांव पडले फांसी गरी. कारण येथे स्वातंत्र्यसैनिकांना फासावर लटकविले जात होते.
 
समुद्रसपाटीपासून 2140 फूट व जमिनीपासून 350 फूट उंचीच्या लहानशा टेकडीवर हे शिवमंदिर आहे. 468 पायर्‍या चढून महादेवाचे दर्शन घेता येते. मंदिराच्या टेकडीवर चढून गेल्यानंतर संपूर्ण रांचीचे मनोहारी दर्शन घडते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

घसरणीनंतर सोन्याच्या दरात सुधारणा, बाजारात पुन्हा तेजी, चांदीच्या दरातही वाढ

LIVE: अश्विनी भिडे बीएमसीच्या पहिल्या महिला आयुक्त बनल्या

महाराष्ट्रातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी, नवीन सत्र १५ जून पासून सुरू होणार

Tennis legend Leander Paes joins BJP: टेनिस स्टार लिएंडर पेस यांचा भाजपमध्ये प्रवेश; बंगाल निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग

मुंबईतील सायन रुग्णालयाच्या एक्स-रे विभागात आग, रुग्णांना सुखरूप बाहेर काढले

पुढील लेख
Show comments