Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

संत एकनाथ महाराज : तीन प्रेरणादायक प्रसंग

संत एकनाथ महाराज : तीन प्रेरणादायक प्रसंग
, गुरूवार, 1 एप्रिल 2021 (10:46 IST)
प्रसंग 1 : जेव्हा पुत्राने वडिलांना 1000 ब्राह्मणांच्या बरोबरीने स्वीकारले
एकदा संत एकनाथांशी नाराज होऊन पुराणमतवादी लोकांनी त्यांच्या पुत्र हरि पंडितला त्यांच्याविरुद्ध हे सांगून विद्रोह करण्यास प्रवृत्त केले की तुझे वडील धर्मग्रंथाचे पाठ मराठी भाषेत करतात आणि कोणच्याही हाताने तयार जेवण जेवतात. हरि जेव्हा याबद्दल एकनाथांशी बोलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा एकनाथ त्याला समजविण्याचा प्रयत्न करतात पण त्याला काहीही पटत नाही.
 
एके दिवस मुलाने वडिलांना म्हटले की आपल्या दोघांची विचार करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे आपण एकमत होऊ शकत नाही म्हणून मी घरी सोडत आहे. हे म्हणत तो घरून निघून गेला आणि वाराणसीमध्ये जाऊन राहू लागला. हरि गेल्यामुळे त्याची आई गिरिजा दुःखी राहू लागली. पत्नीने एकनाथांकडे मुलाला परत आणण्याची जिद्द केली. तेव्हा ‍हरि या शर्यतीवर परत आला की त्याचे वडील त्याच्या सांगण्याप्रमाणे वागतील. नंतर एकनाथांनी संस्कृत भाषेत पाठ करण्यास सुरू केले तर त्यांच्या श्रोत्यांची संख्या कमी होऊ लागली.
 
या दरम्यान एक गरीब वृद्धा एकनाथांजवळ येऊन म्हणाली- मी एक हजार ब्राह्मणांना जेवू घालू इच्छित आहे परंतू हे माझ्यासाठी शक्य नाही. आपल्यासारख्या व्यक्तीला जेवू घातल्याने माझं संकल्प पूर्ण होईल म्हणून माझा आग्रह स्वीकार करावा. दुसर्‍या दिवशी वृद्धाच्या घरी जाऊन पिता-पुत्राने भोजन ग्रहण केलं. जेवल्यानंतर हरिने जशीच एकनाथांची पत्रावळ उचलली तर त्याऐवजी दुसरी पत्रावळ प्रकट झाली. हजार पत्रावळी होयपर्यंत असेच सुरू राहीले. तेव्हा हरि पंडितला समजले की आपले वडील हजार विद्वान ब्राह्मणांच्या समतुल्य आहे. त्याने वडिलांच्या पाया पडून क्षमा मागितली की आता मी कधीही आपल्या कोणत्याही कार्यांत अडथळे घालणार नाही.
 
प्रसंग 2
उपकार आणि क्षमा
महाराष्ट्रात संत एकनाथ नावाचे एक तपस्वी महात्मा होऊन गेले. ते अनेक सद्गुणांनी परिपूर्ण होते. त्यांच्या क्षमा करण्याची भावना अद्भुत होती. एकदा ते नदीत स्नान करून आपल्या निवास स्थळाकडे जात होते. रस्त्यात जात असताना एका झाडावर बसलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर खळखळून गुळणी केली. हे बघून ते एकही शब्द न बोलता पुन्हा अंघोळीसाठी नदीवर गेले. स्नान केल्यावर पुन्हा त्या झाडाखालून जाताना त्या व्यक्तीद्वारे त्यांच्यावर थुंकण्यात आले. तेव्हा एकनाथ पुन्हा जाऊन स्नान करू लागले. 
 
एकनाथ वारंवार स्नान करून त्या झाडाखालून निघत असताना झाडावरील व्यक्ती त्यांच्यावर गुळण्या करीत होता. असे 108 वेळ घडले आणि झाडावर बसलेला दुष्ट व्यक्ती आपली नीचता दाखवत राहिला पण एकनाथांनी धैर्य सोडलं नाही आणि क्षमा यावर अटल राहिले.
 
त्यांनी एकदाही त्या व्यक्तीला काही म्हटले नाही. शेवटी दुष्ट व्यक्तीचे हृदय परिवर्तन झालं आणि त्याने महात्मांच्या चरणात वाकून म्हटले की महाराज माझ्या दुष्ट कृत्यासाठी मला माफ करा. माझ्यासारख्या पापी माणसाला तर नरकात देखील स्थान मिळणे संभव नाही. मी आपल्याला खूप त्रास दिला तरी आपण स्थिर राहिला. मला क्षमा करा महाराज.
 
तेव्हा महात्मा एकनाथांनी त्याला म्हटले की काळजी करण्याची गरज नाही. तुझ्यामुळे आज मला 108 वेळा स्नान करण्याचं सौभाग्य लाभलं.‍ तुझे कितीतरी उपकार आहे!
संताची ही वाणी ऐकून दुष्ट व्यक्तीला आपण केलेल्या कृत्याबद्दल लाज वाटली.
 
प्रसंग 3
देवाची गुलामी करा
संत एकनाथांकडे आलेल्या एका व्यक्तीने म्हटले की- नाथ! आपले जीवन किती मधुर आहे. आम्हाला तर क्षणभर देखील शांती लाभतं नाही. कृपया मार्गदर्शन द्या.
तेव्हा नाथ म्हणाले की तू तर केवळ आठ दिवसांचा पाहुणा आहे, म्हणून पूर्वीप्रमाणेच आपलं जीवन व्यतीत करत राहा. 
हे ऐकून व्यक्ती उदास झाला.
 
तो घरी जाऊन पत्नीला म्हणाला की आजपर्यंत तुला उगाचच कष्ट दिले. त्यासाठी क्षमा असावी. नंतर मुलांना म्हणाला की तुमच्यावर अनेकदा हात उचलला आहे, त्यासाठी मला माफ करा. ज्या लोकांसोबत त्याने दुर्व्यवहार केला होता, त्या सर्वांकडे जाऊन त्याने क्षमा मागितली. या प्रकारे आठ दिवस सरले आणि नवव्या दिवशी तो एकनाथांकडे पोहचला आणि म्हणाला- नाथ, माझ्या शेवटल्या श्वासासाठी किती वेळ शेष आहे?
ती वेळ तर परमेश्वरच ठरवू शकतो, परंतू हे आठ दिवस कसे व्यतीत झाले ते आधी सांग? भोग-विलास आणि आनंद यात व्यतीत केले असतील? 
काय सांगावं नाथ, मला या आठ दिवसात मृत्यूव्यतिरिक्त काहीच दिसेनासे झाले. मला आपल्या हातून घडलेले सर्व दुष्कर्म आठवले आणि पश्चात्ताप करण्यातच वेळ निघून गेला.
 
मित्र, ज्या गोष्टीचा ध्यास घेऊन तू हे आठ दिवस घालवले, आम्ही साधू तेच समोर ठेवून व्यवहार करतो. देह क्षणभंगुर आहे. देहाची माती होणार. देहाची गुलामी करण्यापेक्षा परमेश्वराची गुलामी करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाचा कहर: फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा लॉकडाउन जाहीर, निर्बंध 4 आठवड्यांसाठी कायम राहतील