Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑफिसात जोडप्यांना एक तास सेक्स ब्रेक देण्यावर विचार

ऑफिसात जोडप्यांना एक तास सेक्स ब्रेक देण्यावर विचार
स्टॉकहोम- नोकरीत कर्मचार्‍यांना सवळत देण्यासाठी आणि नवीन प्रयोग करण्यासाठी स्वीडन प्रसिद्ध आहे. जानेवरीत येथे गोथेनबर्गच्या नर्सचे कामाचे तास घटवण्यात आले. आता त्यांना केवळ 6 तास काम करावे लागेल. हे 2 वर्षाच्या पायलट स्कीमचा भाग आहे. कामाचे तास कमी केल्याने ऑफिसमधून गायब राहणार्‍यांची सवय मोडली जाईल आणि नर्स आजारी लोकांकडे अधिक लक्ष देतील.
 
स्वीडन येथील कर्मचार्‍याला इतर युरोपच्या तुलनेत कमी काम करावं लागतं. 2015 मध्ये येथील लोकांना औसतन केवळ 1,685 तासच काम करावं लागायचं. आता येथील ओव्हरटर्नेओ शहरातील काउंसलर पेर-एरिक एक नवीन प्रस्ताव घेऊन आले आहे. हा प्रस्ताव पास झाल्यास प्रेमी आणि ‍विवाहित दंपतींना फायदा होईल. या प्रस्तावप्रमाणे, कपल्सला कामातून एक तास सुट्टी देण्यात येईल ज्यात ते घरी जाऊन आपल्या पार्टनरसोबत सेक्स करू शकतील.
 
एका तासाच्या सुट्टीचे भुगतानही केले जाईल. पेर-एरिकप्रमाणे आधुनिक काळातील व्यस्ततेमुळे कपल्सला एकमेकासोबत अधिक वेळ घाळवत येत नसून हा प्रस्ताव पास झाल्यास त्यांचे नाते मजबूत होतील. नॅशनल स्लीप फाउंडेशन द्वारे केलेल्या शोधाप्रमाणे, प्रत्येक चारमधून एक अमेरिकन कपलला पर्याप्त झोप होत नसल्याची तक्रार आहे.
 
एका शोधाप्रमाणे त्या कपल्सची झोप होऊ पात नाही कारण थकव्यामुळे ते सेक्स करू पात नाही. याव्यतिरिक्त वित्तीय समस्यांमुळे ते जागे राहतात. एका अन्य शोधाप्रमाणे लोकांवर कामाचा इतका भार आहे की सेक्समध्ये त्यांची रूची नाहीशी होत जाते. म्हणून अश्या देशांमध्ये नवीन प्रयोगची आवशक्यतेवर विचार केला जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोकिया 3310 बाजारात दाखल