Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शहीद सुखदेव यांच्या बद्दल माहिती

Webdunia
मंगळवार, 23 मार्च 2021 (09:23 IST)
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक सुखदेव रामलाल थापर यांच्या जन्म लुधियाना येथे झाला होता. 
 
सुखदेवांनी यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या वाङ्‌मयाचा तरुणांत प्रचार केला. यांचा इ. स. १९२८ मध्ये जे. पी. सॉण्डर्स यास यमसदनी धाडण्याच्या कटात सहभाग होता. दिल्ली येथे १९२८ मध्ये सर्व क्रांतिनेत्यांची गुप्त परिषद भरली. भगत सिंग, कॉम्रेड राम चंद्र व भगवती सिंग व्होरा यांच्याबरोबर त्यांनी लाहोरमध्ये नौजवान भारत सभेची स्थापना केली. या संघटेनेचे मुख्य उद्दिष्ट स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे, तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे, जातियतेविरुद्घ लढणे तसेच अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे असे होते.
 
संघटनेच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाँबची कवचे बनविण्यासाठी सुखदेव लाहोरला गेले. नंतर तयार बाँबची चाचणी झांशी येथे घेतली. भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तसेच रशियन राज्यक्रांती व जागतिक क्रांतिकारी साहित्याची छाननी करण्यासाठी लाहोरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला असे म्हणतात. 
 
नोव्हेंबर १९२८ मध्ये लाला लजपतराय यांनी सायमन कमिशन लाहोरला आले असता निदर्शनाचे नेतृत्व केले त्या दरम्यान लाठीमारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड म्हणून ब्रिटिश अधिकारी साँडर्स यावर गोळ्या झाडल्या गेल्या. या कटामध्ये सुखदेव यांचाही सहभाग होता. भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत त्यांना लाहोरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. सुखदेवने १९२९ मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले.
 
महात्मा गांधींनी सुखदेव आणि त्यांचे साथीदार भगतसिंग, राजगुरु यांना खटल्यातून सोडविण्याचे प्रयत्न केले मात्र यश आले नाही. लाहोरच्या तुरुंगात २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत सुखदेव यांनाही फासावर चढविण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह कारागृहाच्या मागील भिंती फोडून गुप्तपणे काढले गेले व त्यांचा लाहोरपासून अंदाजे ५० मैल दूर हुसैनीवाला या ठिकाणी सतलज नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आला.
 
फासावर चढविण्यापूर्वी सुखदेव यांचे महात्मा गांधींना सशस्त्र क्रांतिकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन मुख्य विचारधारांच्या विचारप्रणालींवर प्रकाश टाकते. क्रांतिकारक सुखदेव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लुधियाना येथील शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात सरकार बदलणे गरजेचे म्हणत शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल

मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई,चकमकीत 11 अतिरेकी ठार

मुंबईत प्लास्टिकच्या पिशवीत तुकड्यात मृतदेह आढळले

राहुल गांधी खोटे बोलत असल्याचा भाजपचा आरोप, कारवाई करण्याची मागणी

निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली उद्धव ठाकरेंची बॅग, मोदींची तपासणार का म्हणाले

पुढील लेख
Show comments