Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अश्लील चाळे: समाजाची काय भूमिका?

Webdunia
समाजातील विकृती आणि महिला सुरक्षाव्यवस्था कुचकामी हे पुन्हा समोर आले आहे. यामध्ये आर्थिक राजधानी येथे मुंबईत सार्वजनिक ठिकाणी महिलांसमोर हस्तमैथुन करण्याच्या घटना वाढल्या आहेत. असाच घाणेरडा प्रकार अभिनेते सुमित राघवन यांची पत्नी चिन्मयी सुमित यांना असाच धक्कादायक अनुभव आला आहे. यामध्ये अभिनेत्री चिन्मयी सुमित विलेपार्लेजवळच्या पार्ले टिळक शाळेजवळ होत्या. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या बीएमडब्ल्यू कारमधील चालकाने चिन्मयी यांच्या समोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. चिन्मयी त्या चालकाला मारण्यासाठी त्याच्या दिशेने धावल्या होत्या. मात्र हा विकृत त्यावेळी तो तिथून पळून गेला होता. या सगळ्या प्रकारात चिन्मयी यांना त्या गाडीचे शेवटचे १९८५ हे ४ नंबरच टिपता आले. त्या चालकाने त्याने राखाडी रंगाचा सफारी घातला होता. चिन्मयी यांचे पती अभिनेते सुमित राघवन यांनी घडलेली संपूर्ण घटना ट्विटरवर शेअर केली शिवाय मुंबई पोलिसांकडे मदतीची मागणीही केली. यासंदर्भात चिन्मयी यांनी पोलिसांकडे रीतसर तक्रारही केली. सुमित यांनी मुंबई पोलिसांना ट्विटमध्ये टॅग करत संपूर्ण प्रकार कथन करत या चालकाला लवकरात लवकर पकडणे गरजेचे असल्याचे म्हटले. सुधांशू पांडेच्या ट्विटला उत्तर देताना, ‘तेथे शालेय विद्यार्थिनीदेखील होत्या. त्यामुळे या इसमाने हा विकृत प्रकार त्यांच्यासमोरदेखील केला असा असावा,’ असा संशय सुमित यांनी व्यक्त केला. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी काही तासांमध्येच बेड्या ठोकल्या आहेत.
 
जागरूकतेमुळे ही एक घटना समोर मांडण्यात आली तसेच त्यावर कारवाईही झाली. पण अशीच एक घटना हल्लीच दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीसोबत घडली. ७ फेब्रुवारी रोजी रुट नंबर ७७४ वर धावणाऱ्या एका बसमध्ये ४०-४५ वयाच्या एका व्यक्तीने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केले होते. आरोपी अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडिओही एका विद्यार्थिनीने मोबाईलमध्ये बनवला होता. या व्हिडिओत आरोपीचा चेहरा कैद झाला आहे. या व्हिडिओच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीचा फोटो काढून पोस्टर तयार केले आहेत. हे पोस्टर ठिकठिकाणी चिटकवण्यात आले असून या मार्गावर धावणाऱ्या बसेस, रिक्षा चालकांमध्येही वाटण्यात आले आहेत.हा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला होता. या घटनेची पोलिसांत तक्रार केल्यानंतरही आरोपीला अद्याप पकडण्यात यश आलेलं नाही. अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी २५ हजार रुपये बक्षीस जाहीर केलं आहे. आणि एवढेच नव्हे तर हस्तमैथुन करणे बलात्कार व खुनापेक्षा चांगलं असल्याचे प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरिन यांचे मत पडले. रेप कल्चरमध्ये याला मोठा अपराध समजला जाऊ नये. सार्वजनिक स्थळावर हस्तमैथुन करणं गुन्हा आहे का ? खरं तर हा असा गुन्हा आहे की, ज्यामध्ये कोणी पीडित नसतं, असे मॉडर्न विचार लेखिकाने मांडले आहे.
 
आता या दोन्ही घटना जुळवून बघायला गेलो तर प्रश्न हा आहे की त्याचा विरोध दर्शवून त्याला मारण्यासाठी धावणे योग्य आहे वा अश्या विकृत माणसाचा व्हिडिओ काढणे...किंवा हे कृत्य बलात्कारापेक्षा योग्य असल्याचे मत मांडणे. समाजात अशी विकृती जन्माला येते आणि हळू-हळू वाढते त्यासाठी आपण कुठेतरी जवाबदार नाही का? हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायला हवा. मोठ-मोठ्या शहरांमध्ये दररोज कितीतरी मुली आणि स्त्रिया अश्या विकृतींना तोंड देत असतील. हे कृत्य इतर लोकं बघून न बघण्याचे सोंगही करत असतील. आणि पीडिता तसेच इतर लोकांच्या मौनामुळे निश्चितच असे विकृत चाळे दिवसांदिवस वाढत जातील. अशाने विकासशील देशात स्त्रियांना अजूनही मान खाली घालावी लागते आणि विकृत लोकांची हिंमत वाढू लागते. योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य तो विरोध दर्शवणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी हातावर हात धरून पोलिस व प्रशासनाकडून अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? आपली त्यात काय भूमिका आहे हे त्या परिस्थितीला समोर जाणार्‍या प्रत्येक माणसाने स्वत:ला विचारायला हवी. घटनास्थळी वेळ सूचकता दाखवत आणि आपल्या बौद्धिकतेचा परिचय देत निर्णय घेणे इतरांच्या कर्तव्यांवर प्रश्न फेकण्यापेक्षा कितीतरी आवश्यक आहे. आपणही या समजाचा भाग आहोत आणि आपलेही काही कत्वर्य आहे हे विसरून चालणार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

LIVE: १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात १३ ऑगस्टपासून कोकण आणि मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Flipkart Freedom Sale : स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी! अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती सर्व वस्तूंवर मोठी सूट

Ducati Monster V2 चा भारतात दमदार प्रवेश, ४५,००० किमी पर्यंत सर्व्हिसची गरज नाही! किंमत जाणून घ्या

चिकन खाताना जोडप्याला आढळली 'कंडोम'सारखी वस्तू! पॉपयेज रेस्टॉरंटविरोधात १२.५ कोटींचा दावा

पुढील लेख