suvichar

मिस्कील स्वामी विवेकानंद

Webdunia
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (10:16 IST)
एका ब्रिटिशाने विवेकानंदांना विचारले, 
सगळे कपाने चहा पीत आहेत आणि तू एकटा असभ्यासारखे 
बशीतून चहा पीत आहेस, कारण काय?
विवेकानंदांचे उत्तर ऐकून सभेतील सर्वांनी माना खाली घातल्या.
ते म्हणाले "यावेळी जर कोणी नवीन माणूस येथे आला तर मी एकटाच माझा अर्ध्या चहाचा कप त्याला देऊ शकतो, कारण तुम्ही सर्वांनी तुमचे कप उष्टे केले आहेत. हि आमच्या भारतीयांची संस्कृती आहे."
 
मिस्कील स्वामी विवेकानंद..
स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेत असतानाचा किस्सा आहे.
एक 'पीटर' नावाचे प्रोफेसर विवेकानंद यांचा तीव्र द्वेष करीत. एक दिवस डायनिंग रूममध्ये प्रो पीटर जेवण करीत असताना विवेकानंद हातात जेवणाचे ताट घेऊन आले आणी प्रो पीटर चे शेजारी असलेल्या खुर्ची वर बसले...यामुळे चिडून अस्वस्थ झालेले पीटर बोलले.. 
"मि. विवेकानंद, एक सुंदर पक्षी आणि एक घाणेरडे डुक्कर कधीच एकत्र बसून जेवण करीत नाहीत. "
विवेकानंद यांनी शांतपणे प्रो. पीटर कडे पाहून म्हटले "काळजी करू नका ...  प्रोफेसर मी उडून दूर जातो..!"
प्रोफेसर पीटर यांचा जळफळाट झाला. त्यांनी बदला घेण्याचा निश्चय केला.
 
दुसऱ्या दिवशी वर्गात त्यांनी विवेकानंद यांना उभे करून प्रश्न विचारला "मि. विवेकानंद, तू रस्त्याने जात असताना तुला दोन पिशव्या पडलेल्या दिसल्या.. एका मध्ये पैसे आहेत आणि एका मध्ये शहाणपणा आहे.. तू कोणती पिशवी घेशील?"
एक क्षणाचाही विचार न करता विवेकानंद उत्तरले "अर्थातच पैसे असलेली पिशवी घेईन...
"प्रो. पीटर विवेकानंदांची टर उडवून हेटाळणीच्या सुरात बोलले "तुझ्या जागी मी असतो तर शहाणपणाची पिशवी घेतली असती.."
विवेकानंद यांनी प्रो पीटर यांना सहमती दर्शवून म्हटले "बरोबर आहे.. ज्याचे जवळ जे नाही तेच त्याने घ्यावे.."
प्रो पीटर शरमेने आणि संतापाने लाल झाले. त्यांनी विवेकानंद यांना धडा शिकविण्याचे ठरविले.
 
त्यांनी विवेकानंद यांचे उत्तरपत्रिकेवर 'इडियट' असे लिहिले.
विवेकानंद यांनी उत्तरपत्रिका घेऊन शांतपणे बसून राहिले..
प्रो. पीटर यांनी विचारले "कुणाला काही शंका..??"
विवेकानंद यांनी उत्तरपत्रिका दर्शवित सांगितले "प्रोफेसर...
तुम्ही उत्तरपत्रिकेवर तुमची स्वाक्षरी केली आहे पण मार्क्स द्यायला विसरले आहात ..."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

निसानची ‘Baby Patrol’ कार पुढील महिन्यात येणार; ‘टेक्टॉन’चे जागतिक अनावरण भारतात होणार

तत्काल तिकीट रद्द केल्यास परतावा मिळत नाही का? तुमचा संभ्रम येथे दूर करा

3 प्रीमियम मॅक्सी स्कूटर्स बाजारात येत आहेत वैशिष्ट्ये जाणून घ्या

आनंदाचे दुःखात रूपांतर; लग्नाच्या एक दिवस आधी वधू आणि आई-वडिलांची आत्महत्या

Smartphone Kill Switch: आता चोरी झालेला फोन निरुपयोगी ठरेल, 'किल स्विच'तंत्रज्ञान सादर

पुढील लेख
Show comments