Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्व्हिस सेंटरवर मोबाइल देताना...

Webdunia
गुरूवार, 2 जुलै 2020 (13:02 IST)
मोबाइल खराब होणे ही साधारण बाब आहे. मोबाइल स्वस्त असो वा महाग तो बिघडल्यास दुरुस्तीची वेळ आपल्यावर येते. अशावेळी आपण स्वतःच मेकॅनिक होऊन मोबाइल दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. जर प्रकरण गंभीर असेल तर सर्व्हिस सेंटरकडे धाव घेतो. मात्र सेंटरवर मोबाइल देताना नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. कधी कधी त्या चुका महागात पडतात. म्हणूनच सर्व्हिस सेंटरवर मोबाइल देताना कोणकोणत्या बाबींची खबरदारी घ्यावी, याबाबतीत इथे काही टिप्स .... 
 
अधिकृत सर्व्हिस सेंटर : सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाइल दुरुस्ती ही अधिकृत सर्व्हिस सेंटरवर करावी. काही सर्व्हिस सेंटरवर खोट्या पाट्या लावलेल्या असतात. सर्व्हिस सेंटर भासवण्यासाठीनल केली जाते. मोठमोठ्या बाजारपेठेत लोकल सर्व्हिस सेंटरचे अधिकृत दुरुस्ती केंद्र असल्याचे बोर्ड लावतात. म्हणून याची खातरजमा
करण्यासाठी कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून सेंटरचा पत्ता घ्यावा. याशिवाय संकेतस्थळावरही सर्व्हिस सेंटरवर मोबाइल देताना...
 
आपल्याला अधिकृत सेंटरची माहिती मिळवू शकते.
डेटा बॅकअपः सर्व्हिस सेंटरवर मोबाइल जमा करण्यापूर्वी फोनमधील उपलब्ध एक-एक फोटो, नंबर आणि अन्य गोष्टींचा बॅकअप घ्या. हा बॅकअप आपण दुसरा फोन, लॅपटॉप, हाडॅडिस्क, मेमरी कार्ड किंवा गुगल ड्राइव्हवर किंवा मोबाइल कंपनीच्या क्लाऊडवर घेऊ शकता. कारण सर्व्हिस सेंटरकडून आपला खासगी डेटा सार्वजनिक होऊ शकतो, त्याचबरोबर डिलिटही होऊ शकतो.
 
सिमकार्ड, मेमरी कार्ड, बॅटरी काढून घ्याः सर्व्हिस सेंटरवर अनेकदा घाईगडबडीत सिमकार्ड आणि मेमरी कार्ड ठेवतो. परंतु ही बाब चुकीची आहे. जोपर्यंत बॅटरीचा प्रश्न आहे, आजकाल नॉन रिमूव्हबेल बॅटरी येत आहेत. सर्व्हिस सेंटरवर सिमकार्ड ठेवण्याचा अर्थ म्हणजे तिजोरीची चावी देण्यासारखेच आहे. पे बिल घ्याः सर्व्हिस सेंटर अनेकदासॉफ्टवेअर अपडेट करतात. स्पेअर पार्टस्‌ बदलण्याचे पैसे घेतात. अशात आपण पार्टस्‌ बदलण्याचे पे बिल मागा. त्याचबरोबर खराब होण्याच्या कारणाचा शोध घ्या.
 
लिस्ट तयार कराः अनेकदा फोनमध्ये अनेकप्रकारच्या अडचणी येतात. मात्र सर्व्हिस सेंटरवर गेल्यानंतर आपण काही बाबी सांगण्याचे विसरून जातो. यासाठी मोबाइलसंदर्भात असलेल्या तक्रारीची घरातच यादी तयार करावी आणि ती सर्व्हिस सेंटरवर मांडावी. जेणेकरून एखादी गोष्ट विसरली जाणार नाही 
महेश कोळी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

मुंबईतील सोन्या-चांदीचे आजचे दर जाणून घ्या

धोनी चेन्नईत शेवटचा सामना खेळणार!CSK सीईओ विश्वनाथयांचा खुलासा

हिंदूंना नाही तर भाजपला धोका आहे, असे का म्हणाले विजय वडेट्टीवार?

उद्धव ठाकरेंच्या 2 दिवसांत दोनदा तपासण्यांमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं, निवडणूक आयोग म्हणाला- शहा आणि नड्डा यांचीही चौकशी झाली

24 तासांत दुसऱ्यांदा तपास, शिवसेना यूबीटी नेते उद्धव ठाकरे संतापले

पुढील लेख
Show comments