Dharma Sangrah

अशी माझी सायकल, माझी होती सखी सहेली!!

Webdunia
शुक्रवार, 3 जून 2022 (11:12 IST)
असायचीत मोठे भावंडआपल्या लहानपणी
त्यांनी वापरलेली असायची सगळी खेळणी,
आपण त्याचं खेळण्यांशी खेळायचं,
पण आनंदात काही कमी नाही पडायचं,
पहिली ओळख, तीन चाकी सायकली शी,
सवय मागं कुणी ना कुणी असण्याची,
नवीन नव्हती ना ती  दम पकडणार कित्ती,
हँडल तुटून वेगळं पडलं, आमची फजिती,
मग काही  आपल्यासाठी बुवा सायकल नव्हतीच,
घरी एक होती, तीच होती आम्हा सर्वांचीच,
अंगात हुरूप आला, आपण ही शिकावी,
जेंव्हा हातात येई, तेव्हा चालवून बघावी,
झाली पडझड, ढोपर कित्तीदा फुटलं,
पण सायकल शिकायचं वेड मनातून नाही गेलं,
शेवटी आलीच की चालवता सायकल मस्त,
पंखच लागलें होते जणू, विहार नभात,
एके दिवशी मात्र स्वतःची अशी मिळाली नवीनच,
मी तर उडलेच आनंदाने, स्वप्न उतरले सत्यातच,
कॉलेज पर्यंत साथ तिनं ही इमानदारीने निभावली,
अशी माझी सायकल, माझी होती सखी सहेली!!
...अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने'चा २३ वा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार

बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या आरोपीला नीट पुनर्परीक्षेला बसण्यासाठी चार दिवसांचा जामीन मंजूर

फक्त अर्धा तास द्या... भाजपचे सात तुकडे होतील, म्हणत संजय राऊतांचे गिरीश महाजनांना सडेतोड प्रत्युत्तर

गडचिरोलीला 'ग्रीन स्टील हब' बनवण्यासाठी महाराष्ट्राने केंद्राकडे सहा लोहखनिज खाणींची मागणी केली- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई हवामान बातमी: उकाड्यापासून वाचण्यासाठी लोक वर्सोवा बीचवर झोपले , पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला

पुढील लेख
Show comments