Dharma Sangrah

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा

Webdunia
रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (10:32 IST)
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा
 
हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात
 
नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
 
हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही
 
माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी
 
रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर
 
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान
 
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा
 
गीतकार : कुसुमाग्रज

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

स्थानिक'च्या निवडणुकांवर टांगती तलवार

भारतांच्या पोरींनी तिसऱ्यांदा जिंकला वर्ल्डकप

LIVE: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेने मोठी घोषणा केली

नागपूर ते मुंबई दरम्यान ८ डिसेंबरपर्यंत विशेष गाड्या धावतील, महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेने मोठी घोषणा केली

ब्राह्मण मुलींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या IAS अधिकारी संतोष वर्मा यांचा चेहऱ्याला काळे फासणाऱ्यला ५१,००० रुपयांचे बक्षीस जाहीर; ब्राह्मण संघटनांनी केला निषेध

पुढील लेख
Show comments