Festival Posters
✕

फुलाफुलात हासते मराठी

Webdunia
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (14:26 IST)
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
 
आमुच्या मनामनात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदने मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी
 
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्या रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढ्ते मराठी
 
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
 
येथल्या दरीदरीत हिंड्ते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
 
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
 
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक ‘खेळ’ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
 
- कवी सुरेश भट

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

अंडर-१९ आशिया चषकावर भारताची मोहोर; अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव

रुपाली चाकणकर यांचे नाव आणि फोटोचे 'ट्रेडमार्क' रजिस्ट्रेशन; विनापरवाना वापरावर कारवाईचा इशारा

राज्यात थंडीचा कडाका वाढला; धुळ्यात राज्यातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Birsa Munda Jayanti 2026 Wishes in Marathi बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले, ऑटो-टॅक्सी प्रवासही महागणार

पुढील लेख
Show comments