Festival Posters

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा

Webdunia
शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (14:43 IST)
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हे, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
 
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
 
हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात
हो, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात
 
नाही पसरला कर कधी मागायास दान
स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली न मान
स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली न मान
 
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
 
हा, हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्राच्या बाहूत आहे समतेची ग्वाही
हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्राच्या बाहूत आहे समतेची ग्वाही
 
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील मायदेशांतील शिळा
हिच्या संगे जागतील मायदेशांतील शिळा
 
हे, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील मायदेशांतील शिळा
हिच्या संगे जागतील मायदेशांतील शिळा
 
हिच्या संगे जागतील मायदेशांतील शिळा
हिच्या संगे जागतील मायदेशांतील शिळा
 
गीतकार : कुसुमाग्रज

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

सिगारेट लाईटर देण्यास नकार दिल्याने नागपुरात तरुणाची हत्या

मेरठच्या सौरभ हत्या प्रकरणाची आरोपी मुस्कानने दिला मुलीला जन्म

पिटबुलचा ६ वर्षांच्या मुलावर हल्ला; चावा घेतल्याने कान वेगळा झाला

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हल्ला, बॉम्बस्फोटात नऊ मुलांसह 10 जणांचा मृत्यू

सुहास कांदे नाशिकचे 'बिग बॉस असल्याचा मनमाड-नांदगाव मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा दावा

पुढील लेख
Show comments