Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, PM मोदींनी बंपर भरतीची केली घोषणा

Webdunia
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (17:06 IST)
Twitter
Rozgar Mela Program :जर तुम्ही बेरोजगार असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर आजपासून काळजी करणे थांबवा. कारण आता केंद्रातील मोदी सरकारला तुमच्या नोकरीची चिंता सतावू लागली आहे. यासोबतच एक मोठी बातमी आहे की, केंद्र आणि राज्य सरकारने बेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. याच क्रमाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित 'रोजगार मेळा कार्यक्रम'मध्ये भाग घेतला. पंतप्रधानांनी बटण दाबून 71 हजाराहून अधिक नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजचा मोठा रोजगार मेळा सरकारी नोकऱ्या देण्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये कसे काम करत आहे हे दाखवते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, भारतासारख्या तरुण देशात आपले कोट्यवधी युवक या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत. केंद्र सरकार आपल्या तरुणांच्या प्रतिभा आणि उर्जेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, ज्याचा राष्ट्र उभारणीत उपयोग झाला पाहिजे. सेवा निर्यातीच्या बाबतीत भारत आज जगातील एक मोठी शक्ती बनला आहे. आता भारतही जगातील उत्पादन शक्ती गृह बनेल, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, येत्या 1 वर्षात पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील 10 लाख तरुणांना रोजगाराचे प्रमाणपत्र दिले जाईल… सरकारच्या योजनांतर्गत सर्व सरकारी कंपन्यांमध्ये, सैन्यात आणि इतर संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. होत आहेत.
Edited by : Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

मसालेदार भरली वांगी रेसिपी

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

तुम्हालाही आहे का किडनी स्टोनची समस्या चुकूनही हे पदार्थ खाऊ नका

Career in PGDM Business Analytics : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन बिझनेस अॅनालिटिक्स

पुढील लेख
Show comments