Bihar SHSB ASHA Trainer Recruitment 2020 : बिहार सरकारकडून राज्य आरोग्य समिती (एसएचएसबी, एनएचएम) ने जिल्हा आशा प्रशिक्षक पदासाठी 500 रिक्त जागा काढल्या आहेत. या पदासाठी statehealthsocietybihar.org वर जाऊन 31 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.
पात्रता - ANM / GNM मध्ये डिप्लोमा आणि 2 वर्षाचा अनुभव किंवा BAMS / BUMS / BHMS ची पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव किंवा पब्लिक हेल्थ/ सोशल वर्क /सोशल साइंसमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा.
वय मर्यादा - 25 वर्षे ते 60 वर्षे
निवड -अर्जदारांच्या गुणवत्तेच्या आधारे गुणवत्ता यादी काढली जाईल. त्यामध्ये 100 पैकी गुण दिले जातील. शैक्षिणक पात्रतेनुसार 50 गुण निश्चित केले जातील.
25 मार्क्स अनुभवातून येतील. महिलांना 10 क्रमांक अतिरिक्त मिळतील. सेवानिवृत्त स्टाफ नर्स/नर्स/सिस्टर ट्यूटर याना देखील 10 गुणांचा फायदा होणार. कॉम्पुटर प्रमाणपत्र ज्यांचा कडे असेल त्यांना अतिरिक्त 5 गुण दिले जातील.
निवड झालेल्या उमेदवारांची TOT(ट्रेनींग ऑफ ट्रेनर) केले जाईल. जिल्हा आशा प्रशिक्षकांची अंतिम निवड TOT मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार.
या नंतर पास झालेल्या उमेदवारांना जिल्ह्यात प्रशिक्षण दिले जाणार आणि प्रशिक्षणानंतर जिल्ह्यांद्वारे त्यांना एनएचएम, भारत सरकारच्या नियमांनुसार पैसे दिले जातील.