Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Indian Army इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एंट्री भर्ती अधिसूचना जारी, अर्ज सुरू

Indian Army इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एंट्री भर्ती अधिसूचना जारी, अर्ज सुरू
, गुरूवार, 17 मार्च 2022 (15:56 IST)
भारतीय लष्कराने शॉर्ट सर्व्हिस कमिशन NCC स्पेशल एंट्री स्कीम (52 वा कोर्स) भरतीसाठी तपशीलवार अधिसूचना जारी केली आहे. यासह अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पुरुष उमेदवारांसाठी 50 आणि महिला उमेदवारांसाठी 5 जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवार www.joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. वेबसाइटला भेट देऊन उमेदवारांना 'ऑफिसर एंट्री अॅप्लिकेशन/लॉग इन' वर क्लिक करून नोंदणी करावी लागेल. 15 मार्च ते 13 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज घेतले जातील. विशेष प्रवेश योजना 52 वा अभ्यासक्रम ऑक्टोबर 2022 पासून सुरू होईल. या पदांसाठी महिला आणि पुरुष अर्ज करू शकतात. उमेदवार अविवाहित असावा.
 
पात्रता
NCC 'C' प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांसाठी. (किमान बी ग्रेड)
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
NCC च्या 'C' प्रमाणपत्र परीक्षेत किमान 'B' ग्रेड मिळवलेला असावा.
अंतिम वर्षाचे उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
 
वयोमर्यादा: किमान 19 वर्षे आणि कमाल 25 वर्षे. 1 जुलै 2022 पासून वयाची गणना केली जाईल. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 02 जुलै 1997 पूर्वी झालेला नसावा आणि 1 जुलै 2003 नंतर झालेला नसावा.
 
निवड प्रक्रिया
प्राप्त अर्ज प्रथम शॉर्टलिस्ट केले जातील. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल. एसएसबी मुलाखतीची प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेला पाच दिवस लागतील.
पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांनाच दुसऱ्या टप्प्यात पाठवले जाईल. दुसऱ्या टप्प्यात ग्रुप टेस्ट, सायकोलॉजिकल टेस्ट आणि मुलाखत असेल. SSB द्वारे यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाईल.
वैद्यकीय चाचणीत निरोगी आढळलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चहा पुन्हा-पुन्हा गरम करुन पिल्याने जास्त नुकसान होते