Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोठी बातमी : राज्यात लवकरच १२,५०० हजार पोलिसांची भरती होणार

maharashtra cabinet
, गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (07:59 IST)
राज्यात लवकरच १२,५०० हजार पोलिसांची भरती होणार आहे. याबाबत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत  निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पहिल्यांदाच पोलिसांची एवढी मोठी भरती होणार आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. 
 
पोलीस भरतीबाबतच्या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना संधी मिळेल, असा विश्वासही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. तसंच लवकरच या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू होईल, असं ते म्हणाले. 
 
पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरणार आहेत. पदभरतीसाठी वित्त विभागाच्या  दि.४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वयंपाकघरातील या खजिन्याबद्दल माहिती आहे का, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होते मदत