Maharashtra Police Bharti 2024 पोलिस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. वित्त विभागाने मंजूरी दिल्याने राज्यात आता पोलिस भरती होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात एकूण 17471 पोलिसांची भरती होणार आहे, ज्यात राज्य सरकारच्या इतर विभागांना 50 टक्के पद मात्र, पोलिस खात्यात 100 टक्के पद भरतीला मान्यता दिली जाते.
पोलिस शिपाई, बँण्डस्मँन, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई ह्या सर्वांसाठी एकूण 17471 पदांची भरती केली जाणार आहे.
सरकारी नोकरीत कंत्राटी भरतीवरून वाद सुरू असतानाच काही महिन्यांपूर्वी शिंदे- फडणवीस सरकारने पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता. सणासुदीच्या काळात मुबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. मुंबईत 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती.
राज्यातील पोलीस भरतीबाबतची अधिक माहितीसाठी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून अर्ज करावा. उमेदवार एकावेळी एका पदासाठी अर्ज सादर करु शकतात.