Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

वाचनाच्या आवडीतून कारकिर्दीची वाट

वाचनाच्या आवडीतून कारकिर्दीची वाट
, मंगळवार, 9 मार्च 2021 (14:55 IST)
वाचनाची आवड असण्याचे अनेक फायदे आहेत. खरं तर पुस्तकांचं वाचन हा ज्ञान मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. वाचनाचा हा छंद विविध प्रकारच्या करिअरमध्ये यश मिळवून देऊ शकतो. वाचनामुळे आपण प्रगल्भ होतो. भाषा समृद्ध होत जाते. मेंदूला तरतरी येते. मात्र, वाचन करणारे युवक-युवती करिअरचे मार्गही अवलंबू शकतात त्याविषयी जाणून घेऊ...
 
* ‘मार्केट रिसर्च अॅानालिस्ट' स्पर्धक कंपन्या, बाजारपेठेतली स्थिती आणि ग्राहकांच्या व्यवहाराचा अभ्यास करून संबंधित कंपनीची उत्पादनं तसंच सेवा उपलब्ध करून देतात. यात बरंच वाचन करावं लागतं. ‘मार्केटिंग' आणि ‘मार्केट रिसर्च'सह ‘इन्फॉर्मेशन सायन्स'चे अभ्यासक्रम या क्षेत्रात उपयोगी पडतील.
* ‘कंटेंट रायटर' म्हणून काम करता येईल. वेबसाईटस्‌साठी लिखाण करता येईल. ‘ब्लॉगर' म्हणून सुरूवात केल्यानंतर पुढे मार्ग मिळत जातील.
* वाचनाच्या आवडीसह कल्पकता असेल तर ‘स्लोगन रायटिंग' आणि आकर्षक हेडिंग्ज तयार करून ‘कॉपी रायटिंग'च्या क्षेत्रात हात आजमावता येईल.
* प्रकाशनाच्या क्षेत्रात अनेक संधी आहेत.
* पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करून वृत्तपत्रात नोकरी करता येईल. या कामाला सध्या बरंच वलय आहे.
* वकिलांनाही भरपूर वाचन करावं लागतं. सतत कायदे अभ्यासावे लागतात. सर्वोच्च तसंच उच्च न्यायालयाचे निकाल वाचावे लागतात. त्यामुळे वाचनाची आवड इथे तारून नेऊ शकते.
अभय अरविंद

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माया