Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्रमाणपत्र समर्पणाबाबत आवाहन

Appeal to Certificate Surrender to Bogus Sports Certificate Holders Candidates
, गुरूवार, 3 मार्च 2022 (08:43 IST)
खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत ५% आरक्षण ठेवलेले असून काहींनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे. तसेच कांही उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे ,अशा युवा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी म्हणून “बोगस क्रीडा प्रमाणपत्र , बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना” हा शासन निर्णय  निर्गमित करण्यात आला आहे.
 
ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचेकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली असेल, अशा उमेदवारांना तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे अशा उमेदवारांनी मूळ क्रीडा  प्रमाणपत्र व मूळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे व्यक्तिश: अथवा पत्राद्वारे दि. ३१ मे २०२२ पूर्वी समर्पित करण्यात यावीत अशा उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.
 
मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रे व मूळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधित उमेदवार व संबंधीत क्रीडा संघटना यांचे विरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल. बोगस क्रीडा प्रमाणपत्रधारक उमेदवारांनी दि. ३१ मे २०२२ पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळूंगे बालेवाडी, पुणे येथे आपला अहवाल सादर करावा. असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे  श्री ओम प्रकाश बकोरिया, यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी भातसा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु