Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील सहा जिल्ह्यांत पोलीस भरती, महत्वाची माहिती जाणून घ्या

Police recruitment in six districts of the state
, गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (10:55 IST)
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस शिपाई पदासाठी १९ नोव्हेंबरला लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सहा जिल्ह्यांमध्ये ४४४ परीक्षा केंद्र राहणार आहेत. याकरता ११ हजार पोलिसांचा बंदोस्त तैनात करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे. 
 
या लेखी परीक्षेसाठी राज्यभरातील युवकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी पात्र ठरलेले १९ हजार ०३१९ उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत. लेखी परीक्षे दरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ होवू नये यासाठी परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे.
 
परीक्षार्थींची संख्या मोठी असल्याने त्याच्या नियोजनाचे मोठे आव्हान होते. त्यामुळे यापूर्वी तीन ते चार वेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली.  कॉपी तसेच डमी परीक्षार्थी, असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग होणार आहे.
 
या नियमाचे करावे लागणार पालन
दोन तास आधीच केंद्रावर हजर रहावे लागणार.
परीक्षा शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते साडेचार या वेळेत होणार आहे.
परीक्षार्थींनी दुपारी एकपासून केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे.
हॉलतिकिट, सध्याचा फोटो असलेले ओळखपत्र आवश्यक

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयुर्वेदानुसार या ३ कारणांमुळे लोक आजारी पडतात