बँकेत नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी सोनेरी संधी चालून आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने जनरलिस्ट ऑफिसर पदावर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. विस्तृत माहिती जाणून घ्या-
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ मार्च २०२१ पासून सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ६ एप्रिल २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
पदांचा तपशील
जनरलस्टिस्ट ऑफिसर पदासाठी एकूण १५० पदे रिक्त
अनारक्षित प्रवर्गासाठी ६२
ओबीसीसाठी ४०
एससीसाठी २२
ईडब्ल्यूएससाठी १५
एसटी प्रवर्गासाठी ११ रिक्त पद
अर्जासाठी पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून कोणत्याही विषयात किमान ६०% गुणांसह पदवीधर पदवी असणे आवश्यक
किंवा मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठ / संस्थांकडून सीए / आयसीडब्ल्यूए / सीएफए / एफआरएमसारखे व्यावसायिक कोर्स प्रमाण
या व्यतिरिक्त कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत अधिकारी म्हणून ३ वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य.
वयोमर्यादा
२५ ते ३५ वर्षे
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत
अर्ज शुल्क
सर्वसाधारण श्रेणीसाठी शुल्क ११८० रुपये
अनुसूचित जाती / जमाती उमेदवारांसाठी शुल्क ११८ रुपये
महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी नि:शुल्क
निवड प्रक्रिया
उमेदवारांना IBPS मार्फत घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना रँकिंगच्या आधारे १:४ च्या गुणोत्तरात मुलाखतीच्या फेऱ्यांसाठी बोलवले जाईल. दोन्ही परीक्षांच्या आधारे निवड केली जाईल.
पगार
निवडलेल्या उमेदवारांना दरमहा, ४८,१७० रुपये व इतर भत्ते