RRB NTPC Exam 2020: रेलवे भारती मंडळाने एनटीपीसी ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आरआरबी अलाहाबाद(rrbald)ने जाहिरात क्रमांक CEN-01/2019 अंतर्गत नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी)च्या अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये रिक्त पदांची संख्या वाढविण्याची घोषणा केली आहे.
रेलवे भरती मंडळाच्या ताज्या अधिसूचनेनुसार, 28 फेब्रुवारी 2019 रोजी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी(NTPC)ची विविध पदे भरण्यासाठी सेंट्रलाइझ्ड अधिसूचना(CEN)क्रमांक- 01/2019 रोजी प्रकाशित केले होते.
या अधिसूचनेत मेट्रो रेल कोलकाता साठी ट्रॅफिक असिस्टंट(श्रेणी-8)च्या रिक्त जागां मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.या पूर्वी या पदाच्या रिक्त जागा 87 होत्या ज्यांना वाढवून 160 करण्यात आल्या.
सुधारित रिक्त जागेचे तपशील -
अनारक्षित - एकूण 65 पदे.
एससी - एकूण 24 पदे.
एसटी - एकूण 12 पदे.
ओबीसी - एकूण 43 पदे.
ईडब्ल्यूएस -एकूण 16 पदे.
एक्समॅन - एकूण 16 पदे.
एकूण रिक्त जागा - एकूण 160
रेलवे भरती मंडळाने म्हटले आहे की भरती जाहिरात क्रमांक CEN-01/2019 च्या अधिसूचनेमध्ये इतर पदांच्या रिक्त जागां मध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाही.
आरआरबी अलाहाबाद मधील एनटीपीसी 4099 रिक्त जागा-
उल्लेखनीय आहे की आरआरबी अलाहाबाद मध्ये एनटीपीसीच्या पदांवर एकूण 4099 जागा रिक्त आहे. या रिक्त जागेच्या तुलनेत सुमारे 8 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते.
एनटीपीसीच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षेत (28 डिसेंबर 2020 ते 13 जानेवारी 2021 पर्यंत) सुमारे 55 हजार उमेदवार सहभागी होऊ शकतात.
28 डिसेंबर पूर्वी पहिल्या टप्प्याची परीक्षा सुरू होईल. सांगू इच्छितो की आरआरबी एनटीपीसी च्या सीबीटी परीक्षेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात एनटीपीसीच्या रिक्त जागेच्या तुलनेत एकूण 20 उमेदवारांना निवडले जाईल. एकूण रिक्त जागा 35000 च्या जवळ असल्याने या सीबीटी परीक्षे मधून 700000 उमेदवारांची निवड केली जाईल.
1.25 कोटी उमेदवारांनी अर्ज केले होते अर्ज -
आरआरबी एनटीपीसी भरती मध्ये जगभरातून 1.25 कोटी तरुणांनी अर्ज केले होते त्या पैकी 23 लाख उमेदवार पहिल्या टप्प्यात परीक्षा देणार आहेत. सर्व पात्र उमेदवारांना वेगवेगळ्या टप्प्यात सीबीटी साठी बोलविले जाईल आणि त्याच वेळेपत्रकानुसार त्यांना माहिती दिली जाईल. एनटीपीसी भरती परीक्षेद्वारे 35,000 पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहेत.