Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Sarkari Naukri 2023 : रेेल्वेकोच फॅक्टरीमध्ये भरती

Sarkari Naukri 2023 : रेेल्वेकोच फॅक्टरीमध्ये भरती
, मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (14:10 IST)
Sarkari Naukri 2023 :  रेल कोच फॅक्टरी, कपूरथला यांनी विविध ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप उमेदवारीसाठी अर्ज मागवले आहेत. अधिसूचनेनुसार, रेल कोच फॅक्टरीमध्ये ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी 550 रिक्त जागा आहेत. या भरतीची अधिसूचना अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण युवक ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच त्यांनी आयटीआयही करायला हवे आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2023 आहे.
 
ट्रेड अप्रेंटिसशिप रिक्त जागा तपशील
 
फिटर-215
वेल्डर-230
मशिनिस्ट-5
पेंटर -5
सुतार-5
इलेक्ट्रिशियन-75
एसी आणि रेफ्रिजरेटर मेकॅनिक-15
  
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता
रेल कोच फॅक्टरी, कपूरथला येथे ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी उमेदवार किमान 50% गुणांसह पहिली उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असणे गरजे आहे.   
 
वय श्रेणी-
किमान वय - 15 वर्षे
कमाल वय - 24 वर्षे
वय शिथिलता – SC, ST साठी 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्षे
 
अर्ज फी - रु.100. अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आणि महिलांसाठी अर्ज विनामूल्य आहे.
 
अर्ज कसा करायचा
 
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज https://rcf.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल (HN RFH) ने SEEDS लाँच करण्याची घोषणा केली