Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Choose Earrings चेहर्‍यानुसार निवडा इयररिंग्‍स

Webdunia
शनिवार, 25 मार्च 2023 (21:48 IST)
सध्या वेगवेगळ्या इरयरिंग्सची फॅशन आहे तरी प्रत्येक शेप आणि साइजचे कानातले प्रत्येकावर उठून दिसत नाही. म्हणून आवश्यक आहे जाणून घेणे की आपल्या चेहर्‍याच्या आकाराप्रमाणे आपल्यावर कसे कानातले शोभून दिसतील.
 
राउंड
गोल चेहर्‍याला लांबी प्रदान करण्यासाठी लांब आणि पातळ कानातले घालायला हवे. झुमके आणि स्टड्स आपल्या चेहर्‍यावर सूट करणार नाही. म्हणून ड्राप रिंग्स किंवा जरा वळलेले रिंग्सही छान दिसतील. 
 
स्क्वेअर
चेहरा स्क्वेअर असल्यास आपल्याला चेहर्‍याला सौम्यता प्रदान करण्याचा प्रयत्न करायला हवा.  रुंद कानातले निवडण्यापेक्षा लांब कानातले आपल्यावर जास्त सूट करतील. स्क्वेअर आकाराचा दागिणा टाळा. लोंबत असलेले झुमके किंवा ड्राप निवडा. स्क्वेअरसोडून एखादा वेगळा आकार ट्राय करून पाहू शकता. 
 
रेक्टेंगल
आयताकृती चेहर्‍यावरही स्टड्स किंवा कानाला चिटकून असणारे झुमके छान दिसतील. टिपीकल स्टडऐवजी मार्डन, चंकी फंकी स्टड निवडा. बटनस्टाइल किंवा गोल कानातलेही आपल्यावर उठून दिसतील. 
 
हार्टशेप
हृदयाकार चेहर्‍यासाठी झुमके सर्वात उत्तम पर्याय आहे. वरून पातळ आणि खालून रुंदीला अधिक झुमके छान दिसतील. अवतरण त्रिकोण आणि टॉप्स हेही आपल्या चेहर्‍यासाठी पर्फेक्ट आहे.
 
ओव्हल
ओव्हल चेहर्‍याचा शेप सर्वोत्तम आहे. असा शेप असणार्‍या स्त्रिया लकी असतात. त्यांच्या चेहर्‍यावर प्रत्येक शेप, साइज सूट करतं. स्टड, ड्राप, झुमके, चाँदबाली असो वा टॉप्स, यांना जे आवडेल ते घालण्याची विचार करण्याची मुळीच गरज नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

प्रेरणादायी कथा : शूर योद्धा रुद्रसेनची गोष्ट

Sweet Dish : सोनपापडी रेसिपी

जागतिक उच्च रक्तदाब दिन 2025: उच्च रक्तदाब म्हणजे काय, त्याचा इतिहास आणि थीम जाणून घ्या

World Hypertension Day 2025 : जागतिक उच्च रक्तदाब दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments