Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

..असा निवडा तुम्हाला साजेसा परफ्यूम!

Webdunia
गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (12:53 IST)
आजकाल बाजारात एकापेक्षा एक वरचढ असे अनेक परफ्यूम उपलब्ध असतात. पण, यामध्ये आवडता आणि तितकाच प्रभावी परफ्यूम कसा निवडायचा? हा एक गुंताच. अनेकजण योग्य परफ्यूम कसा निवडावा याबाबत संभ्रमात असतात. हा संभ्रम दूर होण्यासाठी आम्ही काही टिप्स आपल्याला सांगत आहोत. परफ्यूम खरेदी करताना या टिप्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल...
 


अधिक कॉन्सन्ट्रेट आणि लाँग लास्टिंग
जाणकारांच्या मते परफ्यूमच्या लेवलवर ईडीपी आणि ईडीटीचा उल्लेख केलेला असतो. तुमच्यासाठी ईडीपीवाला परफ्यूम खरेदी करणे केव्हाही फायदेशीर ठरू शकते. दरम्यान, ईडीपीवाला परफ्यूम अधिक कॉन्सन्ट्रेट आणि लॉंग लास्टिंग असतो.
 
असा निवडा सुगंध
कोणत्याही प्रकारच्या सुगंधाचा परफ्यूम निवडण्यापूर्वी तो एखाद्या छोट्या स्ट्रिपवर लावून तो हुंगून पाहा. त्यानंतरच तो आपल्या बॉडीला लावा आणि मग पाहा त्याचा दरवळ किती काळ राहतो. जर स्ट्रिपवरचा सुगंध 5 ते 10 मिनिटांपर्यंत राहिला तर समजून जा की, तो परफ्यूम तुमच्यासाठी योग्य आहे.
 
कॉफीच्या बियांचा वापर करा..
सुगंधाची पडताळणी करण्यासाठी जात असताना कॉफीच्या बियाही सोबत ठेवा. कारण, अनेकदा वेगवेगळे सुगंध घेतल्यावर गोंधळ उडू शकतो की, कोणत्या परफ्यूमचा सुगंध कोणता आहे. अशा वेळी कॉफीच्या बिया आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण, कॉफीच्या बिया तुमच्या वास घेण्याच्या शक्तीला न्यूट्रलाइज करतात. त्यामुळे तुम्ही एकापाठोपाठ 3 ते 4 सुगंध घेऊ शकता आणि त्यामुळे तुमचा गोंधळही कमी होतो.
 
शरीराच्या विविध अवयांचा वापर करा..
परफ्यूमचा सुंगध ट्राय करण्यासाठी केवळ तो आपल्या मनगटावरच लावू नका. तर, शरीराच्या विविध अवयवांचाही वापर करा.
 
आपल्या आवडीला महत्त्व द्या  
परफ्यूमवर असलेल्या लेबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींवरून तुमचे मत ठरवू नका. तुम्ही तुमच्या आवडीला प्राधान्य द्या. जो सुगंध तुम्हाला आवडेल तोच निवडा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

या DIY व्हिटॅमिन सी सीरमने पिगमेंटेशन आणि डाग निघून जातील, वापरून बघा

तुम्हीही जास्त वेळ उपाशी राहिल्यास तुमच्या शरीराला या 5 समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर भांडत असाल तर हे 3 रिलेशनशिप नियम वापरून पहा

Guru Nanak Jayanti 2024: नानक देव आणि कुष्ठरोगीची गोष्ट

मसालेदार भरली वांगी रेसिपी

पुढील लेख
Show comments