rashifal-2026

For slender youth सडपातळ तरुणांसाठी

Webdunia
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (19:18 IST)
पुरुष म्हटला की तोरांगडा गडीच असला पाहिजे, असा एक मतप्रवाह पूर्वी होता. आजही तो बर्‍यापैकी आहे. पण दणकट, बळकट शरीरयष्टी मिळवणे प्रत्येकाला शक्य होत नाही. काही जणांची अंगकाठीच सडपातळ असते. सामान्यतः बाजारात येणार्‍या फॅशन्स या मध्यम शरीरयष्टीच्या पुरुषांचा विचार करून केलेल्या असतात. त्यामुळे बारीक अथवा सडपातळ तरुणांपुढे आपण कोणती फॅशन करायची असा प्रश्न येतो. त्यातून त्यांच्यात एक कॉम्प्लेक्सही तयार होतो. मात्र अशा तरुणांनी नवीन पेहरावाचे प्रयोग करण्यात भीती बाळगण्याऐवजी काही टिप्स लक्षात ठेवाव्यात.
 
योग्य मापाचे कपडे- सडपातळ तरुणांनी योग्य मापाचे कपडे घालावेत. जास्त मोठे अथवा ढगळे कपडे घातल्यास तुम्ही अधिक बारीक दिसता. तुमची बारीक चण लगेचच लक्षात येईल. त्याऐवजी स्लिम फीट जीन्स वापरा. मात्र स्कीनी जीन्स वापरू नका. कारण अंगाला चिकटलेले कपडे लोकांचे लक्ष वेधून घेतील आणि त्यामुळे आपण काडी पैलवानआहात हे सहज दिसून येईल.
 
लेयरींग : एकाच वेळी वेगवेगळे कपडे घालू शकता. अर्थात फक्त एकावर एक शर्ट किंवा टीशर्ट घालून थर चढवू नका. शर्ट, त्यावर जॅकेट असा पेहराव केल्यास तुमचा सडपातळपणाझाकला जातो.
 
पॅटर्न्स- सडपातळ तरुण विविध रंगांचे पॅटर्न्स वापरु शकतात. रेषा आणि चौकटी प्रकारातील शर्ट वापरल्यास त्यामुळे पेहरावाला उठाव येईल शिवाय बारीक अंगकाठीही चटकन दिसून येणार नाही. खूप दाटीवाटी असलेले पॅटर्न्स मात्र टाळा. क्रू नेक टीशर्ट- बारीक तरुणांनी गोल गळ्याचे टी शर्ट वापरावेत. त्यामुळे खांदे अधिक रुंद वाटतील.
 
मानसी जोशी
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

Summer Recipes : उन्हाळयात शरीराला थंडावा देणाऱ्या कोशिंबिरींच्या रेसिपीज; नक्कीच ट्राय करा

उष्माघात टाळण्याचे उपाय

Career in MD Pathology :एमडी पॅथॉलॉजी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चमकदार, मऊ त्वचे साठी चेहऱ्यावर तूप लावण्याचे फायदे

Fasting Energy Drink एकादशीला बनवा उपवासाचा ऊर्जावर्धक शेक

पुढील लेख
Show comments