घरच्या लग्नात छान छान साड्या, लेहंगा चोली, शरारा, अनारकली असे वैविध्यपूर्ण पेहराव केले जातात. लग्न म्हटलं की काठापदराच्या पारंपरिक साड्यांना महिलावर्गाची पसंती असते. मुख्य लग्नसोहळ्यात या साड्या दिसतातही खूप छान. सध्या स्ट्राईप्स डिझाइनवाल्या साड्यांचा ट्रेंड आहे. बॉलिवूड अभिनेत्रीही अशा साड्या कॅरी करताना दिसत आहेत. या साड्यांमध्ये तुम्ही मॉडर्न दिसू शकता. लग्नप्रसंगी हटके दिसायचं असेल तर ट्राईप्ड साड्यांचा पर्याय निवडायला हरकत नाही.
* लग्नप्रसंगी गुलाबी, लाल, जांभळा, केशरी, पिवळा, हिरवा असे गडद रंग शोभून दिसतात. तुम्हीही अशा रंगांमध्ये स्ट्राईप्ड डिझाईनवाल्या साड्या नेसू शकता. मध्यंतरी शिल्पा शेट्टीने गुलाबी आणि सोनेरी रंगाची स्ट्राईप्ड साडी नेसली होती. तिने या साडीवर व्ही नेकचा ब्लाउज घातला होता. गुलाबी आणि सोनेरी हे कॉम्बिनेशनही छान दिसत होतं.
* साखरपुडा, हळद, मेंदी अशा कार्यक्रमांना स्ट्राईप्डची काळी-पांढरी साडी नेसता येईल. फातिमा सना शेखने अशी साडी नेसलीहोती. तिच्या कॉटनच्या साडीला थोडं नक्षीकामही होतं. फातिमाने यावर पफ डिझाइनचं पूर्ण बाह्यांचं ब्लाउज घातलं होतं. हा लूकही हटके दिसतो.
* आलिया भट्टने मल्टीकलर स्ट्राईप्ड साडी नेसली होती. या साडीवर चंदेरी नक्षीकाम करण्यात आलं होतं. तुम्हीही अशी साडी नेसू शकता. या साडीवर लांब कानातले आणि काळी टिकली उठून दिसेल.
* माधुरी दीक्षितनेही पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या साडीवर सोनेरी पट्टे होते. लग्नासह हळदी समारंभालाही अशी साडी नेसता येईल.
* कियारा अडवाणीने लाल, गुलाबी आणि पिच रंगाची स्ट्राईप्ड साडी नेसली होती. सोनेरी काठांची शरारा पद्धतीची ही साडी तुम्हीही नेसू शकता.
या साडीमुळे तुमचं नक्कीच कौतुक होईल. या साडीवर सोनेरी आणि लाल रंगाचं नक्षीकाम केलेलं ब्लाउज उठून दिसेल. यासोबतच सोनेरी रंगाचं गळ्यातलंही छान दिसेल.