Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Smmer Wedding Fashion नवरदेवासाठी खास समर वेडिंग फॅशन...

Webdunia
शुक्रवार, 31 मार्च 2023 (15:22 IST)
दोस्तांनो, सध्या लाग्नाचा हॉट सीझन आहे. लग्नातले पेहराव म्हटले की मुलींसाठी भरपूर ऑप्शन्स असतात. पण नवर्‍या मुलाचं काय? त्याने कुर्ता पायजमा, शेरवानीपर्यंत मर्यादित का राहावं? उन्हाळ्यात लग्न असेल तर आरामदायी, सुटसुटीत तरीही ट्रेंडी कपड्यांचा ऑप्शन  आहेच की!  अशाच काही हटके पर्यायांबद्दल.... 
 
* दोस्तांनो, नवरदेवासाठी खास लेहंगे आणि अनारकली डिझाईन करण्यात  आले आहेत. असे पेहराव ही नवर्‍या मुलींची मक्तेदारी राहिलेली नाही. असे हटके पेहराव वेगवेगळ्या फॅशन शोजमधून समोर येत आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सच्या सुपीक डोक्यातून अशा हटके पेहरावांची संकल्पना येत आहे. तुम्हीही असं काही तरी ट्राय करू शकता. 
 
* नवरदेवासाठी धोती हा आरामदायी असा ऑप्शन ठरू शकतो. लग्नविधिंमध्ये पारंपरिक कपड्यांना प्राधान्य दिलं जातं. अशा वेळी तुम्ही ही धोती कॅरी करू शकता. गेल्या काही वर्षांमध्ये धोतीचं रुपच पालटून गेलयं. 
 
* जोधपुरी पँट्स किंवा जोधपुरी धोती हा प्रकार ट्राय करायला हरकत नाही. हा प्रकार स्टायलिश दिसतो. वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये या पँट्स उपलब्ध आहेत. 
 
* नेहरू जॅकेट किंवा मोदी जॅकेटचा ट्रेंड अजूनही आहे. भारतीय परांपरिक पोशाखावर जॅकेटची ही स्टाईल खुलून दिसते. यामुळे फॉर्मल आणि एथनिक असे दोन्ही लूक मिळून जातात. ही जॅकेट घालून तुम्ही लेअरिंगचा इफेक्ट साधू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

प्रेरणादायी कथा : शूर योद्धा रुद्रसेनची गोष्ट

Sweet Dish : सोनपापडी रेसिपी

पुढील लेख
Show comments