suvichar

परंपरा आणि ना‍वीन्य!

Webdunia
शनिवार, 17 जुलै 2021 (23:43 IST)
पूर्वी विवाहसमारंभासारख्या कार्यक्रमांना पारंपरिक पेहरावांना पसंती मिळत असे. तथापि, आता बदलत्या काळात पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न होताना दिसतो. यातूनच परंपरा आणि नवता यांचा सुरेख संगम असणारे फॅशनेबल कपडे बाजारात आले आहेत. मिडी, मॅक्सी, बेलबॉटम, पंजाबी ड्रेस, चुडीदार या फॅशनप्रवाहात बराच काळ मागे राहिलेली प्रकारची फॅशन लाँग स्कर्टच्या रूपाने पुन्हा एकदा चालू प्रवाहात आली. लाँग स्कर्टचे रूप, पोत, स्टाईल भलेही वेगळी असली तरी कन्सेप्ट आपल्या परकराशी जुळणारी. त्यानंतर चनियाचोळी, लाचा, शरारा या वेगवेगळ्या रूपात जुनीच परकर-पोलक्याची फॅशन पुन्हा एकदा चांगलीच रुळली.
 
एम्ब्रॉयडरी, नेट, बादलावर्क, आरसा वर्क अशा सगळ्या प्रकारांमध्ये लाचा-घागरा, शरारा हे प्रकार मिळत असले तरी त्या पोषाखाची नजाकत खर्‍या अर्थाने खुलते ते जरदोसी वर्कनेच. वर्कच्या कमी-अधिक प्रमाणानुसार मरगंडी, जॉर्जेट, अमेरिकन जॉर्जेट, सिक्सफोरफोर, मलई सिल्क असे वेगवेगळे कापडाचे प्रकार वापले जातात. वर्कचे ड्रेस गोल्डन, मरून, मोरपंखी, पोपटी लाल अशा रंगांमध्ये विशेष खुलत असले तरी ऑफ व्हाईट, बेबी पिंक, स्काय ब्ल्यू, राणी कलर अशा कोणत्याही शेडमध्ये हे ड्रेसेस उपलब्ध असतात.
 
कापडाचा प्रकार आणि वर्कच्या प्रमाणानुसार हजार-बाराशेपासून 15 ते 20 हजारांपर्यंत या ड्रेसेसच्या किमती असतात. वेगवेगळ्या सामाजिक परंपरानुसार लग्नासाठी महावस्त्र म्हणून शालू, पैठणी किंवा रेशमी साड्यांची खरेदी होत असली तरी रिसेप्शनसाठी मात्र नववधूला असाच पेहराव हवा असतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

Guava Raita चविष्ट, चटपटीत आणि पचनासाठी हलकी डिश पेरूचा रायता

उच्च रक्तदाब हा हृदय आणि मूत्रपिंडांचा शत्रू आहे, ही लक्षणे दिसल्यास धोकादायक आहे

भारतीय नौदल अग्निवीर (संगीतकार) भरती २०२६: दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी उत्तम संधी

Face Shaving Tips: फेस शेविंग करताना महिलांनीं या चुका करू नये

नखे शरीरातील आजारांची रहस्ये उघड करतात , असे ओळखा

पुढील लेख
Show comments