Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या 5 वस्तू योग्य दिशेला ठेवल्याने घरातील सर्व समस्या सुटतील

fengshyui tips
, बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (10:49 IST)
फेंगशुईच्या मतानुसार अश्या बऱ्याच वस्तू आहेत ज्यांना घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. अश्या 5 गोष्टी आहेत जर त्यांना योग्य दिशेला आणि योग्य जागी ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेसह सौख्य आणि भरभराट येते.
 
ताजे फुलं घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. हे फुल कोमजल्यावर आणि सुकल्यावर घरात ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आणि आजार येतात. 
 
घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला झाडे ठेवणे किंवा रोपटं ठेवणे अशुभ असतं. ही दिशा नातं आणि लग्नाच्या इच्छेशी निगडित असते. या दिशेला झाड किंवा रोपटं ठेवल्याने लग्न कार्यात अडथळा आणि वैवाहिक जीवनात कलह होत.
 
नारंगी आणि लिंबाची रोपटं सौभाग्य आणि भरभराटीची सूचक असल्याने हे घराच्या बागेत दक्षिण-पूर्व दिशेला लावल्याने धन-संपत्ती प्राप्त होते. 
 
घरातील दक्षिण दिशेला निळा रंग आणि पाण्याचे चित्र लावू नये. हे कुटुंबियातील सदस्यांच्या सन्मान आणि प्रगतीत अडथळा निर्माण करतं. 
 
घराच्या पूर्व दिशेस धातूपासून बनवलेल्या वस्तू ठेवू नये. या दिशेला ठेवल्याने एखादी व्यक्ती काळजी आणि नकारात्मक ऊर्जेने व्यापते.
 
बैठकीत मोर, पक्षी, माकड, सिंह, गाय, हरीण असे चित्र किंवा जोडप्यात मूर्ती ठेवाव्या. लक्षात ठेवा की, यांचे तोंड घराच्या आतील बाजूस ठेवावं. असे केल्यास शुभ-लाभ मिळतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्य दारावर असावी श्रीगणेशाची मूर्ती