Feng Shui Tips :विद्यार्थी जीवन आव्हानात्मक आहे. त्यांना योग्य परिणाम साध्य करण्यासाठी अनेक महिने कठोर परिश्रम आणि समर्पण घ्यावे लागते.सकारात्मकता, ज्ञान आणि सर्जनशीलता वाढवणाऱ्या अभ्यासासाठी चांगले वातावरण असणे महत्त्वाचे आहे.फेंगशुईचे घटक नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मदत करतात.
फेंगशुई टिप्स विद्यार्थ्यांना नशीब आणि यश मिळवून देण्यासाठी संतुलित वातावरण तयार करण्यात मदत करते. अनेकदा मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही या साठी त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा स्टडी रूम मधये फेंगशुईच्या काही वस्तू ठेवाव्यात आणि फेंगशुईच्या टिप्स अवलंबवावा. जेणे करून मुलांचे लक्ष अभ्यासामध्ये एकाग्रचित्त होईल.चला तर मग जाणून घेऊ या.
एज्युकेशन टॉवर-
फेंगशुईमध्ये एज्युकेशन टॉवर खूप शुभ मानले जाते. एज्युकेशन टॉवर हे चिनी पॅगोडाचे प्रतीक मानले जाते. हे ज्ञान, वाढ आणि एकाग्रतेचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे मुलांच्या अभ्यास कक्षात एज्युकेशन टॉवर ठेवल्याने त्यांची एकाग्रता वाढते. शिक्षणाचा मनोरा उत्तर दिशेला ठेवावा, यामुळे मुलांचे मन अभ्यासात गुंतून राहील.
या वस्तू स्टडी रूम मध्ये ठेवा-
फेंगशुई चिन्हे आणि घटकांमध्ये काही अलौकिक शक्ती आहेत. विंड चाइम्स किंवा ट्युब्युलर बेल्स यांसारखे धातूचे घटक केवळ अभ्यास कक्ष सुशोभित करत नाहीत तर नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी देखील प्रभावी आहेत. मुख्य खिडकीजवळ एक क्रिस्टल बॉल वातावरण सकारात्मक करते .
स्टडी टेबलच्या ईशान्य कोपर्यात स्फटिकाचे झाड असल्यास लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. याशिवाय, हेमॅटाइट, क्रिस्टल बॉल, जेड पॅगोडा आणि लाफिंग बुद्धा या इतर फेंगशुई वस्तू मुलांच्या खोलीत ठेवावे.
चांगल्या प्रकाशाची व्यवस्था करा-
फेंगशुईच्या मते, अंधार दूर करण्यासाठी अभ्यासाच्या खोलीत चांगली प्रकाशयोजना असली पाहिजे. अधिक प्रकाशासाठी, मुलांच्या डेस्कच्या दोन्ही बाजूला दिवे लावा. प्रकाश असा असावा की डोळ्यांना दुखापत होणार नाही याची खात्री करा.
अभ्यासाचे टेबल योग्य पद्धतीने ठेवा-
अभ्यासाचे टेबल हे विद्यार्थ्यांसाठी मंदिरासारखे आहे आणि त्यामुळे ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी खोलीत ठेवावे. खोलीच्या मध्यभागी किंवा भिंती समोर ठेवू नका कारण ते एखाद्याच्या करिअरमधील अडथळ्यांचे प्रतीक आहे. ते दाराच्या दिशेने देखील नसावे .अभ्यास डेस्क ईशान्य कोपर्यात ठेवा किंवा खिडकीच्या उजव्या बाजूला ठेवा.