Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अक्षय फळ देणारी अक्षय तृतीया

अक्षय फळ देणारी अक्षय तृतीया
अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी दान, होम, जप व पितरांचे तर्पण करतात. बुधवार व रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेस पडते ती सर्वात उत्तम तिथी असते. या दिवशी आपणांस अत्यंत प्रिय असेल ते दान करावे. गौरी उत्सवाची या दिवशी सांगता होते. म्हणून स्‍त्रिया या दिवशी हळदीकुंकू करून सुवासिनींना कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, नारळाची करंजी देतात. या शिवाय बत्तासे, मोगर्‍याची फुले किंवा गजरे देतात आणि भिजवलेली हरबर्‍यांनी ओटी भरतात. 

अक्षय तृतीयेचे व्रत कसे करावे ?
* व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठावे
* घराची स्वच्छता व नित्य कर्म करून शुद्ध पाण्याने आंघोळ करावी.
* घरातच एखाद्या पवित्र जागेवर विष्णूची प्रतिमा किंवा चित्र स्थापित करावे.

खाली दिलेल्या मंत्राने संकल्प करावा -

ममाखिलपापक्षयपूर्वक सकल शुभ फल प्राप्तये
भगवत्प्रीतिकामनया देवत्रयपूजनमहं करिष्ये

अक्षय फळ देणारी अक्षय तृतीया
  WD
संकल्प करून भगवान विष्णूला पंचामृताने अंघोळ घालावी.
षोडशोपचार विधीद्वारे विष्णूची पूजा करावी.
भगवान विष्णूला सुगंधित फुलांची माळ घालावी.
नवैद्यात जवस किंवा गव्हाचे सातू, काकडी आणि हरबर्‍याची डाळ द्यावी.
जमत असेल तर विष्णू सहस्रनामाचा जप करावा.
शेवटी तुळशीला पाणी देऊन भक्तिभावाने आरती करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्षय तृतीयावर धन प्राप्तीसाठी 6 सोपे उपाय