Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वट सावित्री अमावस्या वट सावित्री पौर्णिमेहून वेगळी कशी काय

Vat savitri amavasya
, सोमवार, 1 जून 2020 (15:20 IST)
वट सावित्रीचे व्रत कैवल्य वर्षातून दोन वेळा केले जाते. अनेक लोकं वैशाख अमावास्येला देखील हे व्रत करतात. तसेच महाराष्ट्रात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला सवाष्ण स्त्रिया हे व्रत करतात. पण प्रश्न असा उद्भवतो की हे व्रत कैवल्य दोन वेळा का केले जाते.?
 
1 स्कन्द आणि भविष्य पुराणानुसार वट सावित्री व्रत(उपवास) ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जातं. परंतु निर्णयामृतादिच्या अनुसार हे व्रत वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अवसेला केले जातं. भारतात दोन मुख्य पूर्णिमानता आणि अमानता दिनदर्शिका प्रचलित आहे. ह्यामध्ये जास्त अंतर नसून फक्त तिथी वेगळ्या आहेत. पूर्णिमानता दिनदर्शिकेनुसार वट सावित्रीचे व्रत हे वैशाख महिन्यातील अवसेला साजरी केली जाते. ज्याला वट सावित्री अमावस्या म्हणतात. तर अमानता दिनदर्शिकेनुसार हे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरी करतात ज्याला वट सावित्री पौर्णिमा देखील म्हणतात.
 
2 वट सावित्रीचे व्रत विशेषतः उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये प्रचलित आहे. तर वट पौर्णिमेचे व्रत महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण भारतात प्रचलित आहे. 
 
3 वट सावित्रीचे व्रत सवाष्ण बायका आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळविण्यासाठी आणि त्याचा सौंख्यासाठी करतात. दोन्ही व्रतांमागील पौराणिक कथा दोन्ही दिनदर्शिकेमध्ये एकसारखीच आहे.
 
4 दोन्हीही व्रत करताना बायका वडाच्या झाडाची पूजा करून त्याचा भोवती सूत गुंडाळतात. पुराणांमध्ये हे स्पष्ट केलं आहे की वडाच्या झाडांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांचा वास आहे. श्रद्धेनुसार हे उपवास करणाऱ्या स्त्रीच्या नवऱ्याचे अकाळी मृत्यू योग टाळता येतो. वडाचे झाड आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्याची क्षमता ठेवणारे आहे.
 
5 वडाची पूजा आणि सावित्री सत्यवानाच्या कथेची आठवण करून देणारे हे व्रत वट सावित्री म्हणून ओळखले जाते. या उपवासात बायका वडाच्या झाडाची पूजा करतात. सती सावित्रीची कहाणी ऐकूनच किंवा पठण करून सवाष्ण बायकांची अखंड सौभाग्याची इच्छा पूर्ण होते. या व्रताला सर्व प्रकारच्या बायका (कुमारिका,सवाष्ण, वैधव्य आलेल्या, कुपुत्रक आणि सुपुत्रक ) करू शकतात. या व्रताला बायका अखंड सौभाग्य मिळविण्यासाठी करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गंगा दशहरा 2020: जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व