यंदा गंगा सप्तमी सण मंगळवारी, 18 मे रोजी साजरा केला जाईल. गंगा नदी ही हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र असून अनेक शास्त्रांमध्ये या नदीच्या महत्त्वाचं वर्णन आढळतं.
पौराणिक शास्त्रांप्रमाणे वैशाख शुक्ल सप्तमीला गंगा स्वर्गलोकातून भगवान शिव शंकराच्या जटांमध्ये पोहचली होती म्हणून हा दिवस गंगा सप्तमी, गंगा जयंती या रुपात साजरा केला जातो.
या दिवशी देवी गंगाची पूजा केली जाते. या दिवशी गंगा ची उत्पत्ती झाली होती. म्हणून वैशाख शुक्ल सप्तमीला गंगा सप्तमी म्हणतात. या दिवशी काही उपाय केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते.
* गंगा स्नानास स्वतःचे महत्त्व असले तरी वैशाख शुक्ल सप्तमीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने माणसाला सर्व दु: खापासून मुक्ती मिळते.
* या दिवशी पुण्याईचे कार्य केल्याने सर्व पापांचा नाश होतो.
* या दिवशी दान-पुण्याचे विशेष महत्त्व आहे म्हणून या तिथीला गंगा स्नान, तप, ध्यान आणि दान-पुण्य केल्याने मोक्ष प्राप्ती होते.
* असे मानले जाते की या दिवशी मांगलिक दोष ग्रस्त लोकांना गंगा पूजनाचा विशेष फायदा होतो. विधीपूर्वक गंगा पूजन केल्याने अमोघ फळ प्राप्ती होते.
* असे म्हणतात की गंगा नदीत आंघोळ केल्याने दहा पाप नाहीसे होऊन शेवटी मुक्ती मिळते.
* गंगा सप्तमीनिमित्त गंगेमध्ये स्नान करून मानवांची सर्व पापं वाहून जातात.
* या उत्सवासाठी गंगा मंदिरांसह अन्य मंदिरांमध्येही विशेष पूजा केली जाते.
* गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा पूजन व स्नान केल्याने रिद्धी-सिद्धी, यश-सन्मानची प्राप्ती होते.
जीवनदायीनी गंगा स्नान करून, पुण्यसिला नर्मदाचे दर्शन आणि मोक्षदैनी शिप्राचे केवळ स्मरण करून मोक्ष प्राप्त होते.