Jyeshtha Gauri 2023 information in Marathi अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. तीन दिवस साजरा केल्या जाणार्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्या दिवशी विसर्जन करतात. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रात महालक्ष्मी म्हणजे गौरीची चित्रे किंवा आपल्या परंपरेनुसार चिन्हे ठेवली जातात. ज्येष्ठ नक्षत्रात महालक्ष्मीची पूजा करुन महानैवेद्य दाखवले जाते. तिसर्या दिवशी ते मूळ नक्षत्रात गौरीचे विसर्जन करण्यात येते. गौरीला महालक्ष्मी ही म्हटलं जाते आणि ज्येष्ठ नक्षत्र म्हणून पूजले जाते म्हणून याला ज्येष्ठा गौरी पूजन असे संबोधले जाते.
पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते.
ज्येष्ठागौरी पूजन 2023 तिथी आणि मुहूर्त
2023 मध्ये 21 सप्टेंबर रोजी गौरी आव्हान तर 22 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि 23 सप्टेंबर 2023 रोजी गौरी विसर्जन आहे.
ज्येष्ठा गौरी पूजा शुभ मुहूर्त 2023 Jyeshtha Gauri 2023 Puja Muhurat
21 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी आवाहन सकाळी 06:12 वाजेपासून ते दुपारी 03.34 पर्यंत
22 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी पूजन
23 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी विसर्जन सकाळी 06:27 वाजेपासून ते दुपारी 02.55 पर्यंत
अनुराधा नक्षत्राची सुरुवात = 20 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2:58 पासून
अनुराधा नक्षत्र समाप्त = 21 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3:34 पर्यंत
गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा सर्वीकडे वेगवेगळी आहे. काही कुटुंबांमध्ये गौरीचा मुखवटा आहे, तर काही पारंपारिकपणे जलाशयातून पाच, सात किंवा अकरा खडे वा दगड घेऊन त्यांना गौरीस्वरुप मानून पूजा करतात. काही ठिकाणी पाच भांडी उतार असून त्यावर गौरी मुखवटे लावले जातात. तर काही घरांमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळी इत्यादी धान्याच्या ढीग साचून झाकलेले असतात. तर गौरीची चित्रे किंवा पत्रके देखील उपलब्ध आहे. ज्यांची मनोभावे पूजा केली जाते.
हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात.
गौरी पूजन पहिला दिवस
परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दुध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांचा पायावर कुंकाने स्वस्तिक काढलं जातं. घराच्या दारापासून लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवतात. घरात येताना पावलांवरुन गौरींचे मुखवटे आणतात. शंख वाजवून गौरीचं घरात आगमन केलं जातं. लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी... असे म्हणज गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यानं संपूर्ण घरात मिरवत घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा व इतर गोष्टी दाखविण्याची प्रथा असते. मग देवघरासमोर लक्ष्मीची आगमन करुन घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होवो, सुख- समृध्दी येवो अशी प्रार्थना केली जाते. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात.
गौरी पूजन दुसरा दिवस
दुसर्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे महापूजन होतं. या दिवशी पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. गौरींना वेगवेगळे फळे अर्पण केली जातात आणि धान्यांच्या राशी लावल्या जातात. अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
गौरी विसर्जन तिसरा दिवस
तिसर्या दिवशी मूल नक्षत्रात गौरीचे खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून विसर्जन करतात. या दिवशी कापसाचे गाठ बांधतात. सूतमध्ये हळद, कोरडे फळे, तमालपत्र, फुलं, झेंडूची पाने, काजूची फुलं, रेशीम धागा मिसळतात. गौरी पूजन करुन आरती करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.
दोरकाची पूजा
तिसर्या दिवशी काही भागात गौरीच्या पूजेबरोबरच गुंडांना कापसाच्या सोळा गाठी देऊन पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून दोरा घरातील सुना-मुलींच्या गळ्यात बांधतात. अश्विन वद्य अष्टमीची गळ्यावरून काढून पूजा केली जाते. ही दोरी महालक्ष्मी असल्याचे समजले जाते.
ज्येष्ठा गौरी आरती Jyeshtha Gauri Aarti
भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा
अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा
गणेशा सहित गौरी धनिष्ठा
बैसली येउनि सकळिया निष्ठा ||१||
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
ज्येष्ठा नक्षत्र पुजेचा महिमा
षडरस पक्वान्ने होती सुखधामा
सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा
तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
उत्थापन मूळावर होता अगजाई
वर देती झाली देवी विप्राचे गृही
रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी
वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
ज्येष्ठा गौरी कथा Jyeshtha Gauri Katha Marathi