Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पांडव पंचमी का साजरी करतात, महत्त्व ,पूजाविधी जाणून घ्या

पांडव पंचमी का साजरी करतात, महत्त्व ,पूजाविधी जाणून घ्या
, शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (10:23 IST)
पांडव पंचमी म्हणजे पांडवांचा विजय दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पांडवांनी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली अल्प संख्याबळ असूनही युद्ध करून कौरवसेनेचा नायनाट केला होता. या सणाचे महत्तव तसेच सण साजरा करण्याची पद्धत काय हे जाणून घ्या- 
 
श्रीकृष्णाच्या आदेशानुसार पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला, तो दिवस म्हणजे पांडव पंचमी. पांडव पंचमीला पांडवांची मनोभावे पूजा करून त्यांच्यात असलेले आदर्श गुण ग्रहण करणे असा उद्देश्य असावा. द्यूतात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवासात काढावे लागले. आजच्याच तिथीला म्हणजेच कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. पांडवांनी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली कौरवांवर विजय मिळवला, तो दिवस म्हणजे पांडव पंचमी असे. 
 घरात त्यांच्यासारखे गुणवान पुत्र जन्माला यावे म्हणून पांडव पंचमी साजरा करतात. आणि पांडवांची पूजा करतात. 
 
पूजा विधी-
या दिवशी गायीच्या शेणापासून पांडव सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात. 
पंचमीला वातावरणात ईश्वराकडून येणारी पांडवांची आदर्श तत्त्वे आणि गुण अधिक प्रमाणात असतात. गायीच्या शेणामध्ये ती मोठ्या प्रमाणात आकर्षिली जातात. घरात पांडव पंचमीची पूजा केल्याने आदर्श तत्त्वे आणि गुण आपल्यात येण्यास साहाय्य होते. 
गायीचे शेण सात्त्विक असून जिवाला लाभ होतो.
 
या दिवशी श्रीकृष्णाचा नामजप करावा. या प्रकारे प्रार्थना करावी की ‘हे कृष्णा, ज्याप्रमाणे तुझ्या आदेशानुसार पांडवांनी कौरवांच्या विरुद्ध युद्ध करून विजय मिळवला, त्याप्रमाणे आम्हाला गुरूंचे आज्ञापालन करून देवा तुझ्यासारखे गुण आमच्यात येण्याचे बळ दे. आमच्यावर सदैव तुझी कृपा असू दे. 
 
 हा दिवस जैन संस्कृतीत ज्ञानपंचमी म्हणून साजरा होतो. या दिवशी ध्यान व प्रार्थना केल्यास ‘ज्ञान’ प्राप्त होतं अशी आख्यायिका आहे. 
 






Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

10 Names of Shani प्रत्येक शनिवारी 10 नावांचा जप करा, शनिदेव प्रसन्न होतील