1. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी मंत्राचा कमळ गट्टा माळेने 108 वेळेस जप करावा
मंत्र
- ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मयै नम:
याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.
2. महादेवाने मस्तकावर चंद्र धारण केलेला असल्यामुळे महादेवाची पूजा केल्यास चंद्रदेवही प्रसन्न होतात. या पौर्णिमेला महादेवानिमित्त हा उपाय केल्यास स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महादेवाला खीर नैवेद्य दाखवावी. खीर घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये तयार करावी. नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्यावेळाने खीर प्रसाद स्वरुपात ग्रहण करावी.
याने मानसिक शांती व आर्थिक क्षेत्रात लाभ होतो.
3. शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेची रात्र औषधी गुणयुक्त असते. या योगामध्ये ग्रहण करण्यात आलेल्या औषधाचा लाभ लवकर होतो. ज्या प्रकारे सूर्य प्रकाशाचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो ठीक त्याचप्रकारे या
पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावाने आपल्याला आरोग्यदायी लाभ होतो. यामुळे काहीकाळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात अवश्य बसावे.
याने त्वचा उजळते आणि मनाला शांती मिळते.
4. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थोडावेळ चंद्राकडे पाहा.
याने डोळ्यांची शक्ती वाढेल.
5. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हनुमानासमोर चौमुखी(चार वातींचा) दिवा लावावा. दिव्यामध्ये चारही वाती चार दिशांकडे असतील अशाप्रकारे दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर हनुमान चालीसाचे पाठ करावे. हनुमान चालीसा
माहिती नसल्यास 'श्रीराम जय राम जय जय राम' हा जप करावा.