Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरस्वती जिभेवर बसते का? जाणून हे खरंच असे होते का?

Webdunia
बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (07:30 IST)
आपण घरातील मोठ्याने नेहमी असे काही म्हणताना ऐकले असेल की देवी सरस्वती 24 तासांतून प्रत्येकाच्या जिभेवर नक्कीच येते, म्हणून प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलला पाहिजे. आपण जे बोलतो ते कधी कधी खरे ठरते याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला असेलच. तेव्हा जिभेवर माता सरस्वती असते असे म्हणतात. निश्चितपणे सांगणे कठीण आहे, पण माता सरस्वतीला कोणाच्या जिभेवर आणण्याची योग्य वेळ कोणती? ब्रह्म मुहूर्त हा शास्त्रात अत्यंत शुभ मानला गेला आहे. या काळात अशी अनेक मिनिटे आहेत. जेव्हा माणसाच्या जिभेवर माता सरस्वतीचा वास असतो. या टप्प्यावर जे काही सांगितले जाते ते खरे ठरते. ती वेळ कोणती जाणून घ्या-
 
सरस्वती देवी जिभेवर कधी बसते?
मान्यतेनुसार पहाटे 3.20 ते 3.40 या वेळेत देवी सरस्वती जिभेवर बसते. त्यामुळे यावेळी काहीही बोलण्यापूर्वी विचार करुन योग्य आणि चागंले ते बोलावे. यावेळी बोललेली वाणी खरी ठरू शकते. बोलण्यात कटुता नसावी यावर मोठे लोक नेहमी भर देतात.
 
आधी विचार करा आणि नंतर बोला
तुम्ही जे बोलता ते इतरांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आधी विचार करा आणि नंतर बोला. कारण तुमच्या जिभेवर कधी सरस्वती बसेल कुणास ठाऊक. या काळात तुमच्या तोंडातून असे काहीही बाहेर पडू नये ज्यामुळे कोणाचेही किंवा स्वत:चे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करणे आणि समजून घेणे नेहमीच महत्त्वाचे असते. जे आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवतात आणि आपल्या शब्दाने इतरांना त्रास देत नाहीत त्यांनाच माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे कोणाचाही अपमान करू नये.
 
नेहमी चांगलं बोला
देवी सरस्वती ही बुद्धी आणि ज्ञानाची देवी मानली जाते. देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जप आणि पूजा करावी. तुम्हाला इतरांना वाईट बोलण्यास मनाई आहे कारण तुमच्या जिभेवर सरस्वती कधी येईल आणि जे सांगितले जाईल ते खरे होऊ शकेल कोणास ठाऊक. त्यामुळे माणसाने नेहमी लोकांशी चांगले बोलले पाहिजे. कोणाबद्दल वाईट बोलू नये.
 
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया त्याची पुष्टी करत नाही.)

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Dev Diwali 2024: देव दिवाळीला कधी, कुठे आणि किती दिवे लावायचे?

Budhwar puja vidhi : बुधवार वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

विष्णुस्तवराजः

Tulsi vivah 2024 Upay: तुळशी विवाहाच्या दिवशी यापैकी एक तरी उपाय करा, समृद्धी मिळवा

गौरगणोद्देशदीपिका

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments