Basant Panchami 2024: दरवर्षी वसंत पंचमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी केली जाते. सरस्वती देवी पूजसह ये दिवशी पेन आणि शाईची पूजा देखील केली जाते. यंदा वसंत पंचमी 14 फेब्रुवारी 2024 बुधवार रोजी आहे.
वसंत पंचमी या दिवशी माता सरस्वतीच्या पूजेबरोबरच लक्ष्मीचीही पूजा केली जाते. या दिवशी कामदेवाचीही पूजा केली जाते. नागराज तक्षकाचीही पूजा या दिवशी केली जाते. ज्ञान, बुद्धी, कला आणि संस्कृतीची देवी माता सरस्वतीची पूजा आणि आरती शुभ मुहूर्तावर कशी करावी हे जाणून घेऊया.
दोन सरस्वती : सरस्वती नावाच्या दोन देवींचा उल्लेख आहे. असे मानले जाते की एक विद्येची देवी आहे आणि दुसरी संगीताची देवी आहे. दोघांची पूजा करावी. बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावदनी आणि वाग्देवी. एक कमळावर तर दुसरी हंसावर विराजमना असते.
वसंत पंचमी तिथी 2024 :
पंचमी तिथी प्रारम्भ- 13 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 02:41 पासून
पंचमी तिथी समाप्त- 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12:09 पर्यंत
वसन्त पंचमी शुभ मुहूर्त-
वसंत पंचमी सरस्वती पूजा मुहूर्त- 14 फेब्रुवारी 2024, बुधवार सकाळी 07:01 ते दुपारी 12:35 दरम्यान.
अमृत काल मुहूर्त: सकाळी 08:30 ते 09:59.
संध्याकाळची वेळ: 06:08 ते 06:33 पर्यंत.
रवि योग: दुसऱ्या दिवशी सकाळी 10:43 ते 07:00 पर्यंत.
सरस्वती पूजा विधी Basant Panchami Puja Vidhi -
- यादिवशी गणपतीची पूजा करुन कलश स्थापना करुन सरस्वती देवी पूजन आरंभ करण्याचा नियम आहे.
- देवी सरस्वतीची पूजा पंचोपचार किंवा षोडशोपचार पद्धतीने करावी.
- आंघोळीनंतर स्वच्छ भगवे, पिवळे, वासंती किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घाला.
- माता सरस्वतीचे चित्र किंवा मूर्ती व्यासपीठावर ठेवा.
- पाटाभोवती रांगोळी काढावी.
- फुलांनी पूजन स्थलाचा श्रृंगार करावा.
- पिवळ्या रंगाच्या अक्षतांनी ॐ लिहून पूजन करावे.
देवी सरस्वती पूजनावेळी हा श्लोक वाचवा-
ॐ श्री सरस्वती शुक्लवर्णां सस्मितां सुमनोहराम्।। कोटिचंद्रप्रभामुष्टपुष्टश्रीयुक्तविग्रहाम्।
वह्निशुद्धां शुकाधानां वीणापुस्तकमधारिणीम्।। रत्नसारेन्द्रनिर्माणनवभूषणभूषिताम्।
सुपूजितां सुरगणैब्रह्मविष्णुशिवादिभि:।। वन्दे भक्तया वन्दिता च मुनींद्रमनुमानवै:।
- आता पांढरी फुले, चंदन, पांढरे वस्त्र इत्यादींनी सरस्वतीची पूजा करावी.
- सर्व प्रथम देवी सरस्वतीला स्नानाचे प्रौक्षण करुन देवीला सिंदूर आणि इतर श्रृंगाराचे सामान अर्पण करावे.
- आता फुलांची माळ अर्पण करावी.
- पूजेच्या वेळी देवी सरस्वतीला आम्र मंजरी अर्पण करावी.
- शारदा देवीची प्रार्थना वाचावी.
- सरस्वती देवीची आरती करावी.
- 'श्रीं ह्रीं सरस्वत्यै स्वाहा' या मंत्राने देवी सरस्वतीची पूजा करावी.
- या दिवशी देवीला पिवळ्या मिठाई किंवा वासंती रंगाचे पदार्थ किंवा वासंती खीर किंवा केशर भात अर्पण करावा.
- देवी सरस्वती कवच पठण करावे.
- जर तुम्ही अभ्यासाशी संबंधित काम करत असाल तर सर्व शैक्षणिक साहित्य, पेंटब्रश, पेन, वह्या, वही इत्यादींसह देवी सरस्वतीची पूजा करावी.
- तुम्ही संगीत क्षेत्रात असाल तर वाद्य यंत्राची पूजा करावी.
सरस्वती मंत्र vasant panchami mantra
1. माता सरस्वती एकाक्षरी बीज मंत्र- 'ऐं' ।
2. 'सरस्वत्यै नमो नित्यं भद्रकाल्यै नमो नम:। वेद वेदान्त वेदांग विद्यास्थानेभ्य एव च।।
सरस्वति महाभागे विद्ये कमललोचने। विद्यारूपे विशालाक्षी विद्यां देहि नमोस्तुते।।'
3. ॐ ह्रीं ऐं ह्रीं सरस्वत्यै नमः।
4. 'ऎं ह्रीं श्रीं वाग्वादिनी सरस्वती देवी मम जिव्हायां। सर्व विद्यां देही दापय-दापय स्वाहा।'
5. ॐ ऐं वाग्दैव्यै विद्महे कामराजाय धीमही तन्नो देवी प्रचोदयात।
6. ॐ वद् वद् वाग्वादिनी स्वाहा।
7. 'ॐ शारदा माता ईश्वरी मैं नित सुमरि तोय हाथ जोड़ अरजी करूं विद्या वर दे मोय।