Publish Date: Tue, 04 Aug 2026 (11:15 IST)
Updated Date: Tue, 04 Aug 2026 (11:25 IST)
मराठी सिनेसृष्टीतुन अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील तरुण अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मराठी अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे ३ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वावर आणि नाट्यसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे.
ऋषिकेश कानडे मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्या या अकाली निधनामुळे मराठी नाट्यसृष्टीवर आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार ऋषिकेश कानडे यांनी देशभक्तीवर आधारित 'मी भारतीय' या नाटकाचे जवळपास ३०० प्रयोग केले होते, ज्यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके बनले होते. ऋषिकेश कानडे यांना राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयासाठी सलग दोन वर्षे रौप्यपदकाने गौरविण्यात आले होते. ते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्याने देणारे एक प्रभावी वक्ते म्हणून देखील प्रसिद्ध होते. तसेच त्यांचा स्वतःचा फिटनेस क्लबही होता. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
Edited By- Dhanashri Naik