ganesh chaturthi

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठमोळ्या गायक-अभिनेत्याचे दु:खद निधन

पंडित चंद्रकांत लिमये यांचे वयाच्या  ७५ वर्षी निधन झाले आहे. पंडित चंद्रकांत लिमये यांचे आसामधील गुवाहाटी येथे रविवारी ३१ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते सपत्नीक आसामच्या सहलीवर गेले होते, तेव्हा ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार मराठी संगीत नाटक आणि नाट्यसंगीताच्या विश्वातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व, पंडित चंद्रकांत लिमये यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी संगीत रंगभूमीची आणि शास्त्रीय संगीत विश्वाची मोठी हानी झाली आहे.
ALSO READ: भारतीय संगीत क्षेत्राला एक मोठा धक्का; सुमन कल्याणपूर यांच निधन
पंडित चंद्रकांत लिमये हे ज्येष्ठ शास्त्रीय गायक, नाट्य अभिनेते आणि नाट्यसंगीतकार होते. तसेच
ते दिवंगत पंडित वसंतराव देशपांडे यांचे प्रमुख शिष्य आणि उत्तराधिकारी होते आणि त्यांच्याकडे १२ वर्षे गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले होते.

त्यांनी 'कट्यार काळजात घुसली' सारख्या प्रसिद्ध नाटकात प्रमुख भूमिका, शास्त्रीय गायकी, नाट्यसंगीत आणि मराठी सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. तसेच त्यांच्या सुरेल गायकीने आणि कलेच्या सेवेने अनेकांना प्रेरणा मिळाली.

त्यांनी संगीत क्षेत्रातील अनेक शिष्यांना मार्गदर्शन केले आणि बालगंधर्व, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची गायकी आणि परंपरा पुढे नेण्याचे मोलाचे काम केले. तसेच मराठी कलाविश्व आणि संगीतप्रेमींसाठी ही अत्यंत दुःखद बातमी आहे. तसेच त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार असून त्यांचे पार्थिव आज ठाण्यात आणण्यात येणार आहे आणि ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी दुपारी २.३० नंतर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
ALSO READ: भास लतादीदींचा, ओळख स्वतःची: सुमन कल्याणपूर यांच्या सुरांचा प्रवास!
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भास लतादीदींचा, ओळख स्वतःची: सुमन कल्याणपूर यांच्या सुरांचा प्रवास!