Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओळखा बघू काय ?

Webdunia
शनिवार, 10 एप्रिल 2021 (10:56 IST)
१. काळा खडक, पिवळं पाणी, आत पोहते चंदाराणी = कढई, तेल, पुरी
 
२. काळी काठी, तेल लाटी, वाकते पण मोडत नाही = डोक्यावरचे केस
 
३. तळ्यात तळं, तळ्यात खांब, शेपटीने पाणी पितो गंगाराम = समई, तेल, वात
 
४. दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी = डोळे
 
५. काळ्या कोठारात म्हातारी मेली, पाचजण असून दोघांनी नेली = शेंबुड
 
६. बत्तीस चिरे, त्यात नागीण फिरे = दात आणि जीभ
 
७. सुपभर लाह्या, मधे रुपय्या = चांदण्या व चंद्र
 
८. घाटावरून आला भट, त्याचा काष्टा घट = कांदा
 
९. आकाशातून पडली घार, रक्त प्याले घटाघटा, मांस खाल्ले पटापटा = शहाळे/नारळ
 
१०. एवढसं पोर, घर राखण्यात थोर = कुलूप
 
११. एवढीशी बेबी, चुलीपुढे उभी = फुंकणी 
 
१२. तार तार तारले, विजापूर मारले, बारा वर्षे तप केले, हाती नाही लागले = उंबराचे फुल
 
१३. पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवं, कात नाही, चुना नाही, तोंड कसं रंगलं = पोपट
 
१४. लहानसे झाड, त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा = ओवा
 
१५. जांभळा झगा अंगावर, मुकुट घालते डोक्यावर = वांगे
 
१६. अटांगण पटांगण, लाल रान, बत्तीस पिंपळांना एकच पान = जीभ
 
१७. हरण पळतं, दूध गळतं = दळणाचे जाते
 
१८. आठ तोंडे, जीभ नाही, गाणे मात्र सुरेल गाई = बासरी
 
१९. काळी गाय, काटे खाय, पाण्याला बघून उभी ऱ्हाय = चामड्याची वहाण/चप्पल
 
२०. वीस लुगडी, आतून उघडी = मक्याचे कणीस
 
२१. सरसर गेला साप नव्हे, गडगड गेला गाडा नव्हे, गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे = पाण्याचा रहाट

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

श्रीसर्वोत्तम रौप्य महोत्सवाचा प्रथम दिवसीय सोहळा

पौष्टिक पालक डोसा रेसिपी

पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन मार्केटिंग मैनेजमेंट मध्ये करिअर करा

औषधांशिवाय आरोग्याची काळजी घ्या, हे 10 सोपे घरगुती उपाय अवलंबवा

चेहऱ्यावरील मुरुम काढण्यासाठी लसणाचा वापर

पुढील लेख
Show comments